मुंबई : मालाड कांदिवलीच्यामध्ये वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर धावत्या बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे, मेट्रो लाईन ७ रेड लाईनच्या पुलाखाली आज सकाळी १० वाजता ही घटना घडली. बस आगीत जाळून खाक झाल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
View this post on Instagram
मुंबईतील मालाड पूर्वेकडील बोरिवलीकडे जाणाऱ्या टाइम्स ऑफ इंडिया ब्रिजजवळ एका खासगी बसला आग लागली. आग लागल्यानंतर बसने काही क्षणातच पेट घेतला आणि संपूर्ण बस आगीच्या भक्षस्थानी सापडली. सर्व प्रवाशांना वेळेवर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने मोठ्या मेहनतीनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.






