मोहित सोमण: आज शेअर बाजारात जागतिक अस्थिरतेचा डंका वाजला गेला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून होणारे सेल ऑफ व वाढती भूराजकीय अस्थिरता यामुळे भारतीय गुंतवणूकदारांनीही सावधगिरीचा कल कायम ठेवल्याने इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रातही घसरण झाली आहे. अखेरच्या सत्रात सेन्सेक्स ३२४.१७ अंकांनी घसरत ८३२४६.१८ पातळीवर स्थिरावला असून निफ्टी १०८.८५ अंकाने घसलत २५५८५.५० पातळीवर स्थिरावला आहे. आज मोठ्या प्रमाणात ब्लू चिप्स (मोठ्या दिग्गज शेअर) शेअर्समध्ये घसरण झाल्याने बँक निर्देशांकासह शेअर बाजारात मिड व स्मॉल कॅप शेअर्समध्येही फटका जाणवला.एकत्रित फटका बसल्याने इंट्राडे ५०० अंकापर्यंत घसरण झाली असली तरी अखेरच्या सत्रात मात्र काही पातळीवर बाजार सावरले आहे. दुपारपर्यंत विक्रीचा दबाव वाढल्याने गुंतवणूकदारांनी बाय ऑन डिप्स रणनीती वापरून नफा बुकिंग केले त्यामुळे आगामी काळातील सरकारात्मक आशावाद बळावल्याने काही किरकोळ प्रमाणात शेअर बाजारात अखेरच्या सत्रात दिलासा मिळाला. विशेष तिमाही कंपन्यांच्या निकालावर गुंतवणूकदारांचे लक्ष केंद्रित असताना भूराजकीय घडामोडीचा परिणामही क्षेत्रीय विशेष निर्देशांकात होत आहे. अमेरिकेने आता ग्रीनलँड ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले असताना युएस कडून युरोपियन युनियन देशांवर अतिरिक्त टॅरिफची घोषणा करण्यात आली आहे. युएस विरोधात युरोपियन देशांनी मोर्चेबांधणी सुरू केली असताना त्याचा विशेष परिणाम कमोडिटी बाजारात दिसत आहे. कच्च्या तेलाच्या निर्देशांकात सातत्याने वाढ होत असताना आज सोन्याच्या व चांदीच्या दरातही तुफान वाढ झाल्याने प्रथमच चांदी ३ लाखाची पातळी पार करण्यास यशस्वी ठरली. भारतीय बाजारातील युएस भारत यांच्यातील द्विपक्षीय करारावरही शंका कायम असल्याने अद्याप अस्थिरता कायम राहू शकते.
दुसरीकडे सकाळच्या सत्रात बियरिश सेटिंमेंट बाजारात कायम राहिल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूकीसाठी वातावरण निर्मिती झाली नाही. मात्र दुपारच्या घसरणीनंतर डॉलरच्या तुलनेत रूपया १२ पैशांनी वधारल्याने शेअर बाजारात रिकव्हरी झाली होती. यासह मूडीज व आयएमएफने वर्तवलेला आगामी जीडीपीचा अंदाज बाजारात आधार देऊन गेला. आशियाई बाजारातील अखेरच्या सत्रात संमिश्र प्रतिसाद कायम राहिला. गिफ्ट निफ्टी (०.६७%) सह हेंगसेंग (१%), निकेयी २२५ (०.७५%), स्ट्रेट टाईम्स (०.२९%) निर्देशांकात झाली असून सर्वाधिक वाढ कोसपी (१.३०%), जकार्ता कंपोझिट (०.६९%), शांघाई कंपोझिट (०.२९%), तैवान वेटेड (०.७३%) निर्देशांकात झाली आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेतील जीडीपी वाढ सलग चार तिमाहीतील सर्वाधिक कमी पातळीवर घसरली आहे जी केवष ४.५% झाली. दुसरीकडे युरोपियन शेअर बाजारातही ग्रीनलँड घडामोडींमुळे आज घसरण होत आहे. युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात नासडाक सपाट पातळीवर उघडला असून डाऊ जोन्स (०.८७%), एस अँड पी ५० (०.०६%) या दोन्ही निर्देशांकात घसरण झाली आहे.
आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ जिंदाल सॉ (१५.११%), वेलस्पून कॉर्पोरेशन (६.१०%), जेएसडब्लू इन्फ्रास्ट्रक्चर (५.९०%), हिताची एनर्जी (५.२४%), फोर्स मोटर्स (४.५२%), इंटरग्लोब एव्हिऐशन (४.२७%) समभागात (Stocks) झाली असून सर्वाधिक घसरण विप्रो (८.०४%), आरबीएल बँक (६.७०%), आयडीबीआय बँक (५.६५%), एमआरपीएल (५.३०%), एचबीएल इंजिनिअरिंग (४.९९%), लेमन ट्री हॉटेल्स (४.७७%), किर्लोस्कर ब्रदर्स (४.५४%), तेजस नेटवर्क (४.२३%), ओला इलेक्ट्रिक (४.०५%), सोनाटा सॉफ्टवेअर (३.८६%) समभागात झाली आहे.
त्यामुळे एकूणच या निमित्ताने बाजारात कंसोलिडेशनची फेज सुरु असल्याचे सिद्ध झाले आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात नफा बुकिंग सुरू असल्याने आगामी काळात विशेषतः बजेटपूर्व काळात गुंतवणूकदार कसा प्रतिसाद देतील ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आठ युरोपीय राष्ट्रांविरुद्ध नवीन टॅरिफ धमक्या जाहीर केल्यानंतर जागतिक जोखीम घेण्याची क्षमता कमी झाली ज्यामुळे संभाव्य अमेरिका-ईयू व्यापार वादाची चिंता पुन्हा निर्माण झाली. या घडामोडीमुळे जागतिक शेअर बाजारांमध्ये व्यापक जोखीम-मुक्त वातावरण निर्माण झाले ज्यामुळे गुंतवणूकदारांना सोन्यासारख्या सुरक्षित-आश्रयस्थान असलेल्या मालमत्तेकडे वळण्यास प्रवृत्त केले. दरम्यान, निवडक आशियाई बाजारपेठांनी विशेषतः चीनने अनुकूल मॅक्रो निर्देशक आणि अपेक्षेपेक्षा जास्त निर्यात-चालित जीडीपी वाढीमुळे सापेक्ष लवचिकता दाखवली. स्थानिक पातळीवर, चालू असलेल्या परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) बहिर्गमन (Outflow) दरम्यान भावना सावध राहते. तिसरा तिमाहीचा उत्पन्न हंगाम पुढे जात असताना, स्टॉक-विशिष्ट अस्थिरता होण्याची शक्यता आहे, विशेषतः जिथे कामगिरी मिश्रित आहे. एकूणच, जागतिक अनिश्चितता आणि देशांतर्गत ट्रिगर्सचे मिश्रण पाहता, बाजारपेठा एकत्रीकरण क्षेत्रात राहण्याची अपेक्षा आहे.'
बाजारातील निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे म्हणाले आहेत की,'निफ्टीवर मंदीचे वर्चस्व कायम राहिले आणि संपूर्ण सत्रादरम्यान निर्देशांक २० ईएमएच्या (Exponential Moving Average) खाली टिकून राहिला. इंट्राडे अस्थिरता कायम होती आणि प्रत्येक वाढीच्या वेळी विक्रीचा दबाव दिसून आला. आरएसआय (Relative Strength Index) मंदीच्या क्रॉसओव्हरमध्ये राहिला आणि निर्देशांक अनेक दिवसांच्या नीचांकी पातळीवर बंद झाल्याने त्यात आणखी घसरण झाली. अस्थिरता निर्देशांक इंडिया (VIX) मधील वाढीवरून दिसून येते की बाजारातील भीतीची पातळी उच्च राहिली. नजीकच्या काळात, निर्देशांक आणखी खाली घसरू शकतो, ज्यामध्ये संभाव्य घसरणीचे लक्ष्य सुमारे २५२०० असू शकते, तर २५७०० पातळीच्या जवळ प्रतिकार पातळी आहे.
बाजारातील बँक निफ्टीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे तांत्रिक विश्लेषक वत्सल भुवा म्हणाले आहेत की,'सोमवारच्या सत्रात, बँक निफ्टीने त्याच्या २०-दिवसांच्या एसएमएजवळ जोरदार आधार घेतला, जिथे खरेदीचा कल दिसून आला, जो खालच्या स्तरांवर (Down Side) मागणी असल्याचे दर्शवतो. सध्या, हा निर्देशांक तेजीच्या संकेतांसह स्थिरावत आहे, कारण तो त्याच्या महत्त्वाच्या अल्प-मुदतीच्या २०-दिवसांच्या एसएमएच्या वर टिकून आहे. आरएसआयने तेजीचा क्रॉसओवर दर्शवला आहे, जो सकारात्मक दृष्टिकोनाला पाठिंबा देत आहे. तथापि, जर निर्देशांक ६०००० पातळीच्या पातळीच्या वर बंद झाला आणि पुढील २-३ सत्रांसाठी ही पातळी टिकवून ठेवली, तरच नवीन गती मिळण्याची शक्यता आहे. नजीकच्या काळात ५९५०० पातळीवर आधार (Support) आहे, तर ६०४०० पातळीवर प्रतिरोध (Resistance) दिसून येत आहे, जे अपेक्षित व्यापार श्रेणी निश्चित करते.