गोव्यात १५ रशियन महिला हत्याकांडाचा उलगडा; आरोपी अलेक्सी लियोनोवची हादरवून टाकणारी कबुली

गोवा : गोव्यात उघडकीस आलेल्या रशियन महिलांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. उत्तर गोव्यातील अरंबोल आणि मोरजिम परिसरात सापडलेल्या दोन रशियन महिलांच्या मृत्यूमागे एकाच व्यक्तीचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. रशियन नागरिक अलेक्सी लियोनोव याला गोवा पोलिसांनी अटक केली असून चौकशीत त्याने धक्कादायक कबुली दिली आहे. केवळ या दोनच नव्हे, तर एकूण १५ महिलांची हत्या केल्याचा दावा अलेक्सीने केला आहे.


अरंबोलमध्ये काही दिवसांपूर्वी ३५ वर्षीय एलेना कस्तानोवा हिचा गळा चिरलेला मृतदेह भाड्याच्या खोलीत आढळून आला होता. घरमालकाने रात्री उशिरा खोली उघडली असता हा प्रकार उघडकीस आला. या घटनेचा तपास सुरू असतानाच पोलिसांना मोरजिम गावात आणखी एका महिलेचा मृतदेह सापडला. ही महिला ३७ वर्षीय एलेना वानेएवा असून तिची हत्या १४ जानेवारी रोजी करण्यात आल्याचे तपासात समोर आले. दोन्ही महिलांची हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आली होती.


तपासादरम्यान संशयाची सुई अलेक्सी लियोनोवकडे वळली आणि चौकशीत त्याने दोन्ही हत्या केल्याची कबुली दिली. मात्र, याहून धक्कादायक म्हणजे अलेक्सीने आपण आतापर्यंत १५ महिलांना ‘मोक्ष’ दिल्याचा दावा केला आहे. पोलिस सूत्रांनुसार, आरोपी रशियन महिलांशी मैत्री करून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून आर्थिक फायद्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकायचा आणि त्या महिलांनी विरोध केला किंवा दुसऱ्या व्यक्तीशी संपर्क वाढवला, तर त्यांची हत्या करायचा.


अलेक्सीने गोव्यासह हिमाचल प्रदेशातही हत्या केल्याचा दावा केला असला, तरी सध्या पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे. आतापर्यंत दोनच हत्या अधिकृतपणे उघडकीस आल्या असून उर्वरित दाव्यांबाबत पुरावे शोधण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणामुळे गोव्यातील सुरक्षा व्यवस्थेवर आणि परदेशी नागरिकांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. गोवा पोलीस आता या कथित सिरीयल किलरच्या दाव्यांमागचे सत्य उघड करण्यासाठी विविध राज्यांतील यंत्रणांशी संपर्क साधत आहेत.

Comments
Add Comment

विदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र भारताचे गेट वे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्याच्या सर्व भागासाठी, वैविध्यपूर्ण क्षेत्रात गुंतवणूक येणार दावोसमध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियन सज्ज,

राजपत्रात नावे घोषित न झाल्याने कोकण भवनातील नगरसेवकांची नोंदणीच लांबली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईचा महापौर कोण होणार आणि कधी होणार याची चर्चा रंगली असली तरी प्रत्यक्षात अद्यापही

नोबेल मिळत नाही म्हणून संतापले ट्रम्प, केली धक्कादायक कृती

वॉशिंग्टन डीसी : जागतिक महाशक्ती अशी ओळख मिरवणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वागणं दिवसागणिक

नितीन नवीन होणार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आणि बिहारचे माजी आरोग्यमंत्री नितीन नवीन यांची भाजपच्या

आताची सर्वात मोठी बातमी-भारतीय अर्थव्यवस्था सुसाटच! आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेच्या अहवालात देशाचा जीडीपी ७.३% वेगाने वाढण्याचा उल्लेख

प्रतिनिधी: आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्था (International Monetary Fund IMF) संस्थेने आपल्या जागतिक आर्थिक आऊटलूक अहवालात भारताबाबत

अस्थिरतेत जागतिक इतिहासात चांदी प्रथमच '३०५०००' पार, सोन्यातही वाढ कायम! गुंतवणूकदारांनी आता काय करावे? वाचा सखोल विश्लेषण

मोहित सोमण: आज जागतिक भूराजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सोन्याचांदीत तुफान वाढ झाली आहे. सोने ३% व चांदी ५%