पोळी-भात सोडता आता वजन करता येणार कमी! जाणून घ्या...

मुंबई : वजन कमी करायचं म्हटलं की सर्वात आधी भात, पोळी आणि बटाट्यांना रामराम ठोकावा लागतो, असा समज आजही अनेकांच्या मनात आहे. मात्र आहारतज्ज्ञांनी हा गैरसमज दूर करत वजन घटवण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन मांडला आहे. खाणं बंद न करता, फक्त खाण्याची वेळ आणि क्रम बदलला तर वजन कमी होऊ शकतं, असं ते सांगतात.


तज्ज्ञांच्या मते, शरीरात चरबी साठण्यामागे ‘इन्सुलिन’ हा हार्मोन महत्त्वाची भूमिका बजावतो. आपण जेव्हा कर्बोदकं खातो, तेव्हा रक्तातील साखर वाढते आणि ती पेशींमध्ये ढकलण्यासाठी इन्सुलिन सक्रिय होतं. इन्सुलिनची पातळी सातत्याने जास्त राहिली तर चरबी साठण्याची प्रक्रिया वेग घेते. त्यामुळे साखरेत अचानक चढउतार होऊ न देणं, हाच वजन नियंत्रणाचा महत्वाचा मुद्दा आहे.


यासाठी अन्नपदार्थ पूर्णपणे टाळण्याऐवजी ते कसे खाल्ले जातात, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, भात किंवा बटाटे शिजवल्यानंतर थंड करून पुन्हा गरम केल्यास त्यातील स्टार्चची रचना बदलते. यामुळे साखर हळूहळू वाढते आणि शरीरावर ताण पडत नाही. त्याचबरोबर जेवताना आधी फायबरयुक्त पदार्थ, नंतर प्रथिनं आणि शेवटी भात-पोळी खाल्ल्यास वजन वाढीचा धोका कमी होतो.


दैनंदिन जीवनात हे पाच बदल केल्यास फरक दिसू शकतो. भात आधी शिजवून ठेवून नंतर गरम करून खाणे, रात्रीच्या जेवणात हलके व प्रथिनयुक्त पदार्थ निवडणे, जेवणानंतर थोडं चालणं, नुसती पोळी किंवा ब्रेड न खाता त्यासोबत तूप-दही-भाजी घेणे आणि जेवणाचा योग्य क्रम पाळणे या सवयी वजन कमी करण्यात मदत करतात.


थोडक्यात, उपाशी राहण्याऐवजी योग्य वेळेत खाल्लं, तर शरीर स्वतःच फॅट बर्निंग मोडमध्ये जातं. पोळी-भात खातानाही वजन आटोक्यात ठेवता येऊ शकत.

Comments
Add Comment

महापालिका निकालानंतर मुंबई काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य - शहराध्यक्ष बदला; भाई जगताप यांनी केली वर्षा गायकवाडांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत २४ जागा राखून सर्वांनाच धक्का देणाऱ्या काँग्रेसमध्ये नवे नाराजीनाट्य सुरू

विप्रो कंपनीचा तिमाही निकाल कमकुवत? ७% नफ्यात घसरण तरीही 'इतका' लाभांश जाहीर

मोहित सोमण: प्रसिद्ध आयटी कंपनी विप्रो (Wipro Limited) कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीला तिसऱ्या तिमाहीत

नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ विजयी उमेदवार

प्रभाग क्र. १ अ) अरुणा शंकर शिंदे, (शिवसेना शिंदे) ब) चांदनी चौगुले (शिवसेना शिंदे) क) जगदीश गवते (शिवसेना शिंदे) ड)

नवी मुंबई महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत

१११ पैकी ६६ जागांवर भाजप विजयी नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवत स्पष्ट आघाडी

मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक -प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

विरोधकांची मराठी भाषेबाबतची भूमिका नकारात्मक मुंबई :  भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन

मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी आधी इतिहासात डोकवावं आणि वर्तमानात पाहावं.….. - भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई :  संयुक्त महाराष्ट्रासाठी १०५ हुतात्म्यांनी जे रक्त सांडले, त्या आंदोलनावर गोळ्या झाडण्याचं पाप