मुंबईच्या महापौर पदाबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा

मुंबई : मुंबईच्या महापौर पदावरून भाजप आणि शिवसेनेत आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनद्वारे संवाद साधून या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मुख्यमंत्री सध्या दावोस दौऱ्यावर आहेत, तेथून ते परतल्यानंतर मुंबईच्या महापौर पदाबाबत शिंदे-फडणवीस यांच्यात बैठक होईल, अशी माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस (स्वित्झर्लंड) येथील जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी झाले आहेत आहेत. तेथूनच त्यांनी फोनवरून एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधला. या चर्चेत दोन्ही नेत्यांनी महापौर पदाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा आणि दावोस दौऱ्यानंतर मुंबईत एकत्र बसून या मुद्यावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला. भाजप उबाठा गटासोबत जाण्याच्या चर्चेत कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट करत, याबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवण्याची गरज नसल्याचे फडणवीसांनी शिंदेंना सांगितले. मुंबईकरांनी महायुतीवर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाईल असे कोणतेही कृत्य कोणत्याही पक्षाकडून होणार नाही, अशी हमी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.



राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा


- दरम्यान, शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा मुक्काम सध्या वांद्रे येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आहे. मुंबई पालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर या नगरसेवकांना इथे हलवण्यात आले. मुंबईत भाजपला सर्वाधिक ८९ जागा मिळाल्या, तर शिवसेना २९, उबाठा ६५, काँग्रेस २४ आणि मनसेला ६ जागांवर समाधान मानावे लागले.
- भाजपला आपल्या मदतीशिवाय महापौर बनवणे अशक्य असल्याचे लक्षात येताच, शिवसेने आपल्या नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलात हलवले आणि भाजपसमोर अडीच वर्षांच्या महापौरपदाचा प्रस्ताव दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस आणि शिंदे यांच्यातील चर्चा महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात ८ एप्रिलपासून बदल; लाईन ९ व २ बी सेवेत, प्रवाशांसाठी अधिक सुलभ व जलद सेवा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती

Chandrashekhar Bawankule: अजित दादांची सावली आता बारामतीत सुनेत्रा माऊली; बावनकुळेंनी जागवल्या ३२ वर्षांच्या ऋणानुबंधांच्या आठवणी

बारामती: "ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य