मोहित सोमण: भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड (Bharat Heavy Electricals Limited) या भारतीय पीएसयु कंपनीने आज आपला तिमाही आर्थिक निकाल जाहीर केला आहे. कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात (Consolidated Net Profit) इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) १९०% वाढला आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबर तिमाहीतील १३४.७० कोटी तुलनेत या तिमाहीत ३९०.४० कोटींवर नफा पोहोचला आहे. कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue from Operations) ७५११.८० कोटी तुलनेत या तिमाहीत ८४७३.१० कोटींवर वाढ झाली आहे. कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या एकूण उत्पन्नात (Total Income) ७३८५.०० कोटी तुलनेत या तिमाहीत ८६९१.८५ कोटीवर वाढ झाली आहे. तिमाहीतील आकडेवारीनुसार, कंपनीच्या करपूर्व नफ्यात (Profit before tax PBT) गेल्या वर्षीच्या तिमाहीतील १७८.७५ कोटी रुपये तुलनेत या तिमाहीत ५१९.८३ कोटींवर वाढ झाली आहे. बेसिक ईपीएस (Basic Earning per share EPS) ०.३६ रुपये वरून १.१० रुपयांवर पोहोचले आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, तिसऱ्या तिमाहीत (Q3FY26) मध्ये ईबीटा (EBITDA) इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ७९% वाढून ३०४.५ कोटींवरून ५४५ कोटी झाला आहे तर माहितीनुसार, ईबीटा (EBITDA) मार्जिन ४.२% वरून ६.४% पर्यंत सुधारला आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये, भेल (BHEL) कंपनीच्या संचालक मंडळाने वाराणसी येथील करखियांव येथे नवीन प्लांट स्थापन करण्यासाठी भांडवली गुंतवणूक योजनेला मंजुरी दिली होती.
एक्सचेंज फायलिंगमध्ये कंपनीच्या संचालक मंडळाने आज झालेल्या बैठकीत सध्याच्या व्यावसायिक परिस्थितीचा विचार करून, उपरोक्त योजना लवकर बंद करण्यास मंजुरी दिली आहे. कंपनीने वाराणसी येथील करखियांव येथील नवीन प्लांटसाठी मूळतः नियोजित उत्पादने आता भेलच्या इतर ठिकाणी तयार करण्याची योजना आखली जात आहे असे कंपनीने म्हटले आहे.
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने (BHEL) रेल वाहतूक क्षेत्रासाठीच्या आपल्या 'मेक इन इंडिया' उपक्रमांमध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला होता. कंपनीच्या (Bhel) TRSL सोबतच्या कन्सोर्टियमद्वारे कार्यान्वित केल्या जात असलेल्या प्रतिष्ठित वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रकल्पासाठी अंडरस्लंग ट्रॅक्शन ट्रान्सफॉर्मरचा पुरवठा सुरू केला जात असल्याचे कंपनीने स्पष्ट केले होते. यापूर्वी कंपनीला भारत कोल गॅसिफिकेशन अँड केमिकल्स लिमिटेड (BCGCL) - कोल इंडिया लिमिटेड (५१%) आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (४९%) यांची एक संयुक्त उद्यम कंपनीकडून तिच्या बीसीजीसीएलच्या लखनपूर, झारसुगुडा जिल्हा,ओडिशा येथील 'कोल टू २००० टीपीडी अमोनियम नायट्रेट' प्रकल्पाच्या कोल गॅसिफिकेशन आणि रॉ सिनगॅस क्लीनिंग प्लांटसाठी ८ जानेवारी २०२६ रोजी प्राप्त झालेल्या बोलीचे स्वीकृती पत्र (Letter of Agreement LOA) म्हणजेच ५४०० कोटींची व्यवसायिक ऑर्डर मिळाल्याचे म्हटले होते.
चांगला नफा मिळाला असतानाही संचालक मंडळाने प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतल्याने गुंतवणूकदारांनी शेअरला नकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये ३% इंट्राडे उच्चांकावर घसरण झाली आहे. दुपारी २.११ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ०.७२% घसरण झाल्याने शेअर २६५.५० रूपयांवर व्यवहार करत आहे. गेल्या ५ दिवसात कंपनीचा शेअर १.५७% घसरला असून गेल्या महिनाभरात शेअर्समध्ये ४.४४% घसरण झाली आहे. गेल्या वर्षभरात शेअरमध्ये २१.४७% घसरण झाली असून इयर टू डेट बेसिसवर (YTD) ९.५९% घसरण झाली आहे.