काबुल : अफगाणिस्तानमध्ये काबुलजवळ शहर ए नॉ जिल्ह्यात सोमवारी बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात किमान सात जणांचा मृत्यू झाला. स्फोटाचा उद्देश चिनी नागरिकांची हत्या हा होता, अशी माहिती अफगाणिस्तानमधील प्रसारमाध्यमांनी दिली आहे.
अफगाणिस्तानच्या राजधानीतील सर्वात सुरक्षित परिसरांपैकी एक समजल्या जाणाऱ्या आणि अनेक परदेशी लोकांचे वास्तव्य असलेल्या गुल्फारोशी स्ट्रीटवरील एका हॉटेलमध्ये स्फोट झाला.
स्फोटात जखमी झालेल्या २० जणांना रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे. जखमी आणि मृत यांच्यात किती चिनी नागरिक आहेत याची नेमकी आकडेवारी अद्याप हाती आलेली नाही. याआधी २०२५ मध्ये काबुलमध्ये एका बँकेबाहेर आणि एका सरकारी इमारतीला लक्ष्य करुन आत्मघाती हल्ले करण्याच्या घटना घडल्या होत्या.