Sunday, January 18, 2026

मुरबाडच्या सरपंच डॉ. कविता वरे-भालके यांना प्रजासत्ताकदिनी दिल्लीत विशेष निमंत्रण

मुरबाडच्या सरपंच डॉ. कविता वरे-भालके यांना प्रजासत्ताकदिनी दिल्लीत विशेष निमंत्रण

लोकसहभागातील विकासकामांची आणि प्रभावी नेतृत्वाची राष्ट्रीय स्तरावर दखल

मुरबाड : मुरबाड तालुक्यातील किसळ–पारगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच तथा प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी डॉ. कविता वरे-भालके यांना प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यानिमित्त दिल्ली येथे विशेष निमंत्रण प्राप्त झाले आहे.

लोकसहभागातून राबवलेल्या विकासकामांची आणि प्रभावी नेतृत्वाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जात असल्याचे हे महत्त्वाचे प्रतीक मानले जात आहे. यापूर्वीही डॉ. वरे-भालके यांना “पंचायत टू पार्लमेंट” या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले होते. तसेच त्यांच्या कार्याची दखल घेत आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन देशांकडून निमंत्रणे मिळाली असून त्यांनी जागतिक व्यासपीठावर स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधित्व केले आहे.

ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण आणि लोकशाही मूल्यांच्या बळकटीसाठी त्यांनी केलेले कार्य किसळ–पारगावसह संपूर्ण मुरबाड तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरत आहे. त्यांच्या या सन्मानामुळे तालुक्यात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments
Add Comment