स्वतःला प्राधान्य द्या...

मनस्वीनी,पूर्णिमा शिंदे 


स्वतःला ओळखा, स्वतःच्या शक्तीला ओळखा. स्वतःला जपा, स्वतःवर प्रेम करा. काळजी घ्या स्वतःची. स्वाभिमानी राहा. स्वतःशी प्रामाणिक राहा. चांगल्याशी चांगलं वागून अपेक्षा ठेवली, तर ते तसेच होईल असे नाही ना! मग का बाळगायचं अपेक्षांचं ओझं? ते ओझं उतरवून फेकून द्या! कधीतरी मोकळं जगा! मोकळा श्वास घ्या... कायम कशात न् कशात गुरफटलेले का राहता? विचारा मनाला पटतंय का? स्वार्थ नकाे, पण शहाणपणा आणा. शहाणपण जे आजपर्यंत नाही केले. लोकांचे लेसन-धडे घेतले. उपकाराची फेड अपकाराने. त्यावर दुसऱ्याला शहाणं करण्याच्या नादात फुकट सल्ले दिले. मूर्ख बनलो. करू दे दुसऱ्याला, जे व्हायचं ते होऊ दे. ज्याचं त्याचं बघतील. निस्तारुदे त्यांना. किती वेळा आपला अमूल्य क्षण वेळ, पैसा, ताकद दुसऱ्यासाठी खर्च करायचे. म्हणून आजच बकेट लिस्ट करा. कामाला लागा. आनंद शोधा. आनंद निर्मिती करा. आनंद टिपा. स्वतःला प्राधान्य द्या. आपल्या मनाला खूश करा. ते दुसरं कोणीच करू शकणार नाही.


तुम्हाला विचारणार आहे का कोणी? बाबा हे काय झालं? तू असा का गप्प आहेस? नाही ना! मग काढा भली मोठी लिस्ट लिहून. जे कधीच नाही केलं ते आता करा. ती वेळ ठरवा. आज विचारा स्वतःला काय हवे? ते दिले आहे का कधी? नाहीस ना! इतरांच्या नादात लक्ष दिले नाही. हो ना. वाटलंच... मला. आपण आपल्यापेक्षा समोरच्याचाच विचार जास्त करतो. सोम्या, गोम्या, ठकी, सखी बाकी त्यांना आता पूर्णविराम द्या. आपली किंमत आपण ठरवा. त्यांच्या नादी लागून आपण आपली किंमत कमी करून घेतोय ना. मग आधी स्वतःला ओळखा. स्वतःची शक्ती स्वतःवर खर्च करा. आजवर जे म्हणत होते ना, तुला काय येतंं! काय जमणार नाही. तेच नेमकं करून दाखवा दुनियेला. जे हसत होते ना त्यांना... अरे कोणाकोणाला वाटतं आपल्याला काही हवे, काही मिळवायचे, जे नाही मिळाले. तेही मग मिळवा. नसेल परिस्थिती अनुकूल, खाल्ल्या खस्ता, काट्यांवरून चाललो. झिजलो चंदनासारखे... पण आता वेळ आली आहे. चूक करू नका, पुन्हा पुन्हा ती चूक निस्तरा, स्वप्नांचा पाठलाग करा, का मन मारून जगताय इतरांसाठी ! जे तुम्हाला कवडीचीही किंमत देत नाहीत. त्यांच्यासाठी आजवर सोडली ना गंगा आपल्या ध्येयावर. मग आताच उठा, लिस्ट करा, कामाला लागा, स्वप्नांचा पाठलाग करा. पुढे जा. कारण तुमच्या हाताला धरून कोणीच तुम्हाला पुढे घेऊन जाणार नाही. जे हसत होते त्यांनी तुमचे स्वागत करून तुम्हाला सन्मान पुरस्कार देईपर्यंत थांबूच नका गड्यांनो! करून दाखवा!! दाखवून द्या त्यांना... अरे मी संघर्ष यात्री आहे. अरे मी संघर्ष योद्धा आहे. माझी सारखे संयम, शिस्त, शांतता आणि प्रयत्न कोणीच करू शकणार नाही. मी आता कोणाच्या दाबण्याने दबणार नाही. बोलण्याने मरणार नाही.एकदा एक दिवस जिंकणार. हार का म्हणून मानायची मी. मी नाहीच मानणार हार.मला राखेतून उठून फिनिक्स पक्षासारखे पुन्हा एकदा उंच आकाशी भरारी मारायची आहे. एका मनाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीतून, दृढनिश्चयातून, आत्मविश्वासाने ठिणगीतून. ती माझ्या मनाला वेडापिसा करतेय. खुणावतेय. म्हणूनच माझी ताकद, शक्ती, ऊर्जा मला माहिती आहे. मी डगमगत नाही. मी महत्त्वाकांक्षी आहे. मी ध्येयवादी आहे. मी स्वप्नवेडी आहे. माझे मला ध्येय गाठायचे आहे. समुद्राच्या लाटा आणि भरून आलेलं आभाळ, कडाडणारी वीज होऊन मनातल्या वादळांना परतवून लावण्याची माझ्यात शक्ती आहे. मी संकल्प केला आहे. माझे मन, मनगट, मणका माझा मेंदू मी पाहिलेली स्वप्नं साकारण्यासाठी सज्ज आहेत. कालाच्या ओघात मागे पडत कधी जाणते-अजाणतेपणे मागे सारत राहिलेली मी माझी स्वप्नं केव्हा तरी एकदा पूर्ण करायचीच आहे. ही बकेट लिस्ट बरं,! होणार लवकरच, पूर्ण. नववर्षाच्या सुरुवातीलाच मनाने मनाला निक्षून सांगितलेला स्वागताचा संकल्प. नववर्षाचा स्वागताचा संकल्प.

Comments
Add Comment

स्मृती

जीवनगंध,पूनम राणे गुरुपौर्णिमेचं निमित्त होतं. विविध रंगांच्या फुलांनी हॉल सजवण्यात आला होता. विद्युत रोषणाई

ताणविरहित शिक्षण

नक्षत्रांचे देणे,डॉ. विजया वाड सगळे पालक तिच्या वर्गाचा आग्रह धरीत. ‘का? तिचाच वर्ग का?’ ‘अहो, आमच्या बाळूचाच तसा

विनाशकाले विपरीत बुद्धी

गोष्ट लहान, अर्थ महान,शिल्पा अष्टमकर मानवी जीवनात बुद्धी ही सर्वात मोठी शक्ती मानली जाते. योग्य वेळी योग्य

सतर्कता

प्रतिभारंग,प्रा. प्रतिभा सराफ हल्ली तसंही रात्री उशिरापर्यंत कोणाला झोप येत नाही. त्यातही वृद्ध असतील तर झोप

सुरक्षित फांदी

कथा,रमेश तांबे  एकदा एक शेठजी एका जंगलात फिरायला गेले होते. जंगल अतिशय घनदाट होते. फिरता फिरता त्यांना एका झाडावर

ढग कसे चमकतात?

कथा ,प्रा. देवबा पाटील नेहमीप्रमाणे संध्याकाळी आपला शाळेचा गृहपाठ व अभ्यास आटोपल्यावर सीता व नीता मावशीजवळ