जे साथ देतील त्यांच्यासोबत, अन्यथा त्यांच्याशिवाय पुढे जाऊ!- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; राजकारणात कोणीही शत्रू नाही

मुंबई : “निवडणुका संपल्या, आता आमचा कोणीही शत्रू नाही. जे असतील, ते आमचे वैचारिक विरोधक आहेत. त्यामुळे मुंबईच्या विकासाच्या अजेंड्याला जे साथ देतील, त्यांना सोबत घेऊ. जे साथ देणार नाहीत त्यांच्याशिवाय पुढे जाऊ. पण, मुंबई आता थांबणार नाही”, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मांडली.


मुंबई पालिका निवडणुकीत विजयी झालेल्या भाजप उमेदवारांचा शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांना संबोधित करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम, मंत्री आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह भाजपचे मुंबईतील वरिष्ठ नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, “काहीजण सांगू लागले आहेत, गेल्यावेळी तुमच्या ८२ जागा आल्या होत्या, त्यात आला केवळ ७ जागांची वाढ झाली, तुम्ही असे कोणंते मोठे यश मिळवले. पण, त्यांना मला सांगायचे आहे, गेल्यावेळी आम्ही २२७ जागा लढवल्या होत्या, त्यापैकी ८२ जिंकलो होतो. पण, यंदा १३५ लढवून ८९ जिंकलो आहोत. एकट्या भाजपला मुंबईत ४५ टक्के मतदान झाले. उबाठाचा विचार करता, भाजपपेक्षा ३० अधिक जागा लढवूनही ते २७ टक्क्यांवर आहेत. गेल्या तीन निवडणुकांत जो सगळ्यात मोठा पक्ष होता, त्याला ८९ जागा कधीच मिळाल्या नव्हत्या. भाजपने कमी जागा लढवून देखील, ते साध्य करून दाखवले.”


फडणवीस म्हणाले, मुंबईतील कुठलाही विभाग बघा, झोपडपट्टीपासून ते टोलेजंग इमारतींपर्यंत सगळ्या समाजाने भाजपला मतदान केले आहे. भाषेच्या, जातीच्या पलिकडे, प्रत्येक समाज भाजपसोबत उभा राहिला आहे. विशेषतः जे लोक मराठी माणसाला आपली जहागीर समजत होते, त्यांच्या हे लक्षात आले आहे, की मुंबईतील मराठी माणूस हा विकासासोबत म्हणजे भाजपसोबत आहे. भाजपने सर्वस्पर्शी आणि सर्वव्यापी यश मिळवले आहे. त्यासाठी अमित साटम यांचे अभिनंदन. अध्यक्ष म्हणून त्यांनी खूप चांगले योगदान दिले. निवडणूक प्रमुख आशिष शेलार आणि सगळ्या आमदारांनी पूर्ण ताकदीने आपापल्या क्षेत्रात प्रचंड मोठा विजय खेचून आणला. त्यामुळे हा टीम मुंबई भाजपचा विजय आहे.



आता मराठी माणूस मुंबईबाहेर जाणार नाही


“या विजयाने आम्ही आनंदीत आहोत. पण, हा आनंद उन्मादात परिवर्तीत होऊ देणार नाही. ज्या दिवशी महायुतीचा महापौर मुंबई पालिकेत बसेल, त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून आम्ही कामाला लागू आणि मुंबईला जगातील उत्तम शहर बनवण्यासाठी प्रयत्न करू. या मुंबईतून एकही मराठी माणूस बाहेर जाणार नाही. झोपडपट्टी, चाळीत, पागडीमध्ये राहणाऱ्या मुंबईकरांना हक्काचे घर देण्याचा संकल्प आम्ही पूर्ण करू. मुंबईची हवा शुद्ध झाली पाहिजे, या अजेंड्यावर काम करू”, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.



मुंबई ‘लिव्हेबल’ आणि ‘लव्हेबल’ बनवू


देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी मुंबईकरांना विश्वास देतो, की सध्या हातात घेतलेली विकासकामे पुढच्या दोन-तीन वर्षांत पूर्ण करू आणि नवीन कामे हाती घेऊ. मुंबई ‘लिव्हेबल’ आणि ‘लव्हेबल’ बनवू. सर्व नगरसेवकांना माझी विनंती आहे, की हा विश्वास मुंबईकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीने केलेल्या विकासावर दाखवलेला आहे. त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकाला या विश्वासाला पात्र ठरावे लागेल. या महापालिकेत पारदर्शी आणि प्रामाणिकतेने कारभार चालवावा लागेल. मुंबई पालिका पूर्णपणे लोकाभिमूख पद्धतीने चालवावी लागेल, जनतेचेच राज्य महापालिकेत चालले पाहिजे, अशा पद्धतीने कारभार चालवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. तरच पुढच्या काळात मुंबईकरांसमोर ताठ मानेने जाता येईल. ”

Comments
Add Comment

Moody's Report: भारताची अर्थव्यवस्था थेट ७.३% वेगाने वाढणार विमा क्षेत्रात क्रांती का अपेक्षित? वाचा...

मुंबई: भारताच्या अर्थव्यवस्थेला एकीकडे चार चांद लागत असताना दुसरीकडे भारताची अर्थव्यवस्था ही ७.३% इतक्या वेगाने

मुंबईसह २९ महापालिकांच्या महापौर पदाची आरक्षण सोडत गुरुवारी

मुंबई : मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या महापौर पदाची आरक्षण सोडत गुरुवार, दि. २२ जानेवारी रोजी काढली जाणार

भेल कंपनीचा तिमाही निकाल जाहीर नफ्यात १९०% दणक्यात वाढ तरीही ३% शेअर घसरला 'या' कारणामुळे

मोहित सोमण: भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड (Bharat Heavy Electricals Limited) या भारतीय पीएसयु कंपनीने आज आपला तिमाही आर्थिक निकाल

भारताचा बिझनेस कॉन्फिडन्स इंडेक्स ५ महिन्यांच्या सर्वोच्च पातळीवर-सीसीआयकडून मोठी माहिती अहवालातून समोर

मुंबई: विविध रेटिंग एजन्सीने भारत अर्थव्यवस्थेचे जगभरात कौतुक केले होते. इतकेच नाही तर गेल्या महिन्यात जर्मनीला

अनेक नगरसेवकांचे पद राहणार की जाणार, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर ठरणार; पुढच्या ४८ तासांत निर्णय येण्याची शक्यता

नागपूर : महाराष्ट्रातल्या २९ महानगरपालिकांचा निकाल जाहीर झाला आहे. मुंबई आणि नागपूरसह एकूण २२

सरकारकडून अस्थिरतेत निर्यातदारांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर! योजना मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचेही आवाहन

मुंबई: जागतिक अस्थिरता स्थिरीकरण करण्यासाठी भारतीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने निर्यातदारांसाठी विविध