नजीब मुल्ला, सुहास देसाईंसह चारही उमेदवार विजयी
ठाणे : ठाणे महापालिका निवडणूक २०२६ चा निकाल जाहीर झाला. प्रभाग क्रमांक १० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला बालेकिल्ला कायम राखत चारही जागांवर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नजीब मुल्ला व सुहास देसाईसह चारही उमेदवार विजयी झाले आहेत.
या निवडणुकीत मनसे, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी आघाडी करून निवडणूक लढवली होती, तर शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाई) यांनी युतीतून सामना दिला. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. प्रभाग क्रमांक १० मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नजीब मुल्ला, सुहास देसाई, प्रो. पुनम सुधाकर माळी आणि खान वहिदा मुस्तफा हे चारही उमेदवार विजयी घोषित झाले.






