Mumbai - Pune Expressway : अटल सेतुपासुन थेट पुण्यापर्यंत ९० मिनिटात,नक्की मार्ग काय ?

Mumbai - Pune Expressway : मुंबई आणि पुणे या महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांरीकांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सध्या अडीच ते तीन तास लागणारा मुंबई–पुणे प्रवास भविष्यात केवळ ९० मिनिटांत पूर्ण होणार आहे. केंद्र सरकारने मुंबई–पुणे दरम्यान सुमारे १३० किलोमीटर लांबीचा नवा सुपरफास्ट एक्सप्रेसवे उभारण्यास मंजुरी दिली असून, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याची अधिकृत घोषणा केली आहे.

सध्या अस्तित्वात असलेल्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरून दररोज हजारो वाहनांची कोंडी पाहायला मिळते. मात्र खंडाळा घाटातील अरुंद वळणं, पावसाळ्यात होणारी घसरण, अपघात आणि सुट्टीच्या दिवसांतील प्रचंड गर्दी यामुळे प्रवास अनेकदा चार ते पाच तासांपर्यंत लांबतो. या कायमस्वरूपी समस्येवर उपाय म्हणून सरकारने सध्याच्या मार्गाच्या समांतर एक अत्याधुनिक आणि वेगवान एक्सप्रेसवे विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

हा नवा मार्ग जेएनपीए परिसरातील अटल सेतूजवळून सुरू होऊन थेट पुण्याजवळील शिवरे जंक्शनपर्यंत जाणार आहे. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे १५ हजार कोटी रुपये असून, पहिल्या टप्प्यात पगोटे ते पनवेल चौक दरम्यानच्या मार्गाला आधीच मंजुरी देण्यात आली आहे.

नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या एक्सप्रेसवेवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. कमी वळणं, सुरक्षित वेगवान लेन, मजबूत पूल आणि आवश्यक ठिकाणी बोगदे उभारले जाणार आहेत. त्यामुळे घाटातील अपघातप्रवण भाग टाळले जातील आणि वाहतूक अधिक सुरळीत होईल.

या मार्गाचा फायदा केवळ मुंबई–पुणेपुरता मर्यादित राहणार नाही. हा एक्सप्रेसवे पूर्ण झाल्यानंतर मुंबई–पुणे–बेंगळुरू हा लांब पल्ल्याचा प्रवास सुमारे साडेपाच तासांत शक्य होईल. त्यामुळे उद्योग, व्यापार, लॉजिस्टिक्स, पर्यटन आणि बंदरांशी संबंधित क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.

मुंबई–पुणे एक्सप्रेसवेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे नितीन गडकरी आता आणखी एक पाऊल पुढे टाकत, भविष्यातील गरजा लक्षात घेऊन हा नवा सुपरफास्ट मार्ग उभारत आहेत. हा प्रकल्प म्हणजे केवळ रस्ता नसून, महाराष्ट्राच्या आर्थिक आणि दळणवळण विकासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
Comments
Add Comment

Maharashtra Rain : विदर्भात पावसाचा कहर! अमरावती-यवतमाळला रेड अलर्ट; 'या' जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

पुढील 24 तास महत्त्वाचे; काही भागांत 200 मिमीपर्यंत पावसाची शक्यता, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन मुंबई:

Chandrashekhar Bawankule : ज्येष्ठ नागरिकांच्या अर्जांवर ९० दिवसांत निर्णय बंधनकारक

- निष्काळजी अधिकाऱ्यांवर होणार कारवाई; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : आई-वडील आणि ज्येष्ठ

Pune Murder : शिक्रापुरात पोत्यात सापडलेल्या तरुणाच्या मृतदेहाचं गूढ उलगडलं; अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटकडून खून

धक्कादायक! पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला; दोन्ही आरोपींना अटक पुणे : पुणे (Pune) जिल्ह्यातील

Ahilyanagar : 'ॲट्रॉसिटी’चे खटले चालवण्यासाठी अहिल्यानगरला विशेष न्यायालय मंजूर

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानूसार (Scheduled Castes and Scheduled Tribes (Prevention of Atrocities) Act) दाखल

IMD Monsoon update : पुढील ४८ तास अत्यंत धोक्याचे; हवामान विभागाकडून धुवांधार पावसाचा इशारा; पाहा तुमचा जिल्हा आहे का ?

मुंबई : राज्यात पावसाने पुन्हा एकदा अत्यंत रौद्र रूप धारण केले असून आगामी दोन दिवस विविध भागांत मुसळधार ते

Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोची पहिली ट्रायल यशस्वी; ट्रॅफिकच्या जाचातून मिळणार दिलासा

माण ते आर. के. लक्ष्मण म्युझियम या १३ किमी टप्प्याला सुरक्षा मंजुरी; पहिल्या टप्प्यात १२ स्थानकांवरून मेट्रो