कोल्हापुरात प्रसुतीनंतर डिस्चार्ज घेऊन घरी जाताना अपघात, बाळंतीणचा मृत्यू, सात दिवसांचं बाळ जखमी, PI ची तडकाफडकी बदली

कोल्हापूर : गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावर कानडेवाडी येथे झालेल्या भीषण अपघातानंतर नेसरी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आबा गाढवे यांची कोल्हापूर पोलिस अधीक्षकांनी तडकाफडकी बदली केली आहे. बाळंतपणानंतर घरी जाणाऱ्या सुवर्णा राहुल कुंदेकर (वय २९ , रा. अडकूर, ता. चंदगड) यांचा या अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांवर संशयित चालकाला संरक्षण दिल्याचा आरोप करत आक्रमक आंदोलन केले. या तणावपूर्ण प्रसंगाने उफाळलेल्या संतापामुळे पोलिस प्रशासनाने घाईघाईने कारवाई करत गाढवे यांची पोलीस कंट्रोल रूमला रवानगी केली.


गुरुवारी दुपारी नेसरीहून अडकूरकडे जाणाऱ्या राहुल कुंदेकर (वय ३२) यांच्या मोटारीला (एमएच ०४ डीएम ३७४९ ) चंदगडहून नेसरीकडे येणाऱ्या स्वप्निल रानगे (राहणार चंदगड) यांच्या मोटारीने (एमएच ०९ जीए ७५१५ ) समोरासमोर धडक दिली. रानगे हे चंदगड नगरपंचायतीतील कर निर्धारण अधिकारी आहेत. या धडकेत सुवर्णा यांच्यासह त्यांचा सात दिवसांचा नवजात बाळ, दोन वर्षांचा रुद्र आणि आरती भाबर (वय ६०, रा. हलकर्णी) असे चार जण जखमी झाले. सुवर्णा यांचा कोल्हापूर रुग्णालयात मृत्यू झाला, तर इतरांची गडहिंग्लजमधील दवाखान्यांत प्रकृती स्थिर आहे. ग्रामस्थांच्या मते, अपघातानंतर नेसरी पोलिसांनी संशयित रानगे याला तात्काळ अटक न करता संरक्षण दिले. यामुळे हजारो अडकूरकरांनी मृतदेह पोलिस ठाण्यासमोर ठेवून मोर्चा काढला आणि एका गाडीला आग लावली.


नेसरी पोलिसांकडून अपघाताची नोंद करण्यात आली असून, रानगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस प्रशासनाने वाहनचालकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. तर "या अपघाताची आम्ही अधिक चौकशी करत असून आरोपीला शिक्षा नक्कीच मिळेल, नागरिकांनी थोडा संयम बाळगावा." अशी प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिली आहे.


दरम्यान, या प्रकरणाने स्थानिक राज्यमार्गावरील सुरक्षा आणि पोलिस कारवाईची निष्पक्षता यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Comments
Add Comment

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी