मलिक कुटुंबात आधी खुशी आधा गम
महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १६५ मधून कप्तान मलिक, प्रभाग क्रमांक १६९मधून बुशरा मलिक आणि प्रभाग क्रमांक १६८मधून डॉ सईदा खान हे माजी मंत्री आणि माजी आमदार नबाव मलिक तसेच विद्यमान आमदार सना मलिक यांच्या कुटुंबातील सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निवडणूक रिंगणात उभे होते. यातील कप्तान मलिक यांचा पराभव झाला असून डॉ सईदा खान आणि बुशरा मलिका यांचा विजय झाला आहे. त्यामुळे मलिका कुटुंबात आधी खुशी आधा गम अशीच परिस्थिती आहे.
समाधान सरवणकर यांचा निसटता पराभव
दादर माहिम विधानसभेतील प्रभाग क्रमांक १९५ मधून शिवसेनेचे समाधान सरवणकर यांचा उबाठाचे निशिकांत शिंदे यांनी पराभव करत ते जाईंट किलर ठरले. १९५ची जागा उबाठाने मनसेला न सोडल्यामुळे मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच उबाठाचे पदाधिकारीही प्रचारापासून दूर राहिले होते. त्यामुळे निशिकांत शिंदे हे बाहेरील उमेदवार असल्याने याचा समाधान सरवणकर यांचा विजय सुकर मानला जात होता. परंतु शेवटच्या क्षणाला गेम फिरला आणि समाधान सरवणकर यांचा निसटता पराभव झाला. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत समाधान सरवणकर यांचा निसटता विजय झाला होता,यावेळी निसटता पराभव झाला आहे.