भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत अवघ्या १५ मतांच्या फरकाने विजय मिळवून भाजपच्या उच्च शिक्षित उमेदवाराने नगरसेवक होण्याचा मान मिळवला. प्रभाग क्र. ३ मधून ॲड. तरुण शर्मा या उच्च शिक्षित उमेदवाराला भाजपने संधी दिली होती. त्यांचा सामना शिवसेनेचे दिग्गज नगरसेवक राजू वेतोस्कर यांच्याशी होता. राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी या प्रभागात विशेष लक्ष दिले होते. त्यामुळे राजू वेतोस्कर यांच्याशी सामना अवघड असतानाही ॲड. तरुण शर्मा या युवकाने बाजी मारत राजू वेतोस्कर यांना पराभवाची धूळ चारली. राजू वेतोस्कर यांना ५३४५ मते मिळाली तर तरुण शर्मा यांना ५३६० मते मिळाली.






