मुलाने जन्मदात्या आईलाच बंदुकीने गोळी मारून संपविले

अणसूर मडकीलवाडीत खळबळजनक घटना


वेंगुर्ले : वेंगुर्ला तालुक्यातील अणसूर मडकीलवाडी येथे मुलानेच जन्मदात्या आईवर बंदुकीने गोळी झाडून तिचा निर्दयी खून केला. मयत महिलेचे नाव वासंती वासुदेव सरमळकर (वय ६५ वर्षे) असे आहे. तर या प्रकरणात दुष्कृत्त करणारा आरोपी मुलगा उमेश वासुदेव सरमळकर (वय ४०) असे त्याचे नाव आहे. दारूचे व्यसन आणि कर्जाच्या कारणावरून हा खून झाला आहे. या घटनेमुळे वेंगुर्ले तालुक्यासह सिंधुदुर्गात खळबळ उडाली. याप्रकरणी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यसनामुळे माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो हे या घटनेने समोर आले आहे. वेंगुर्ले तालुक्यात मुलानेच आईचा खून केल्याची ही पहिलीच दुर्घटना असून या दुष्कृत्याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना दि. १४ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास अणसुर पाल मडकीलवाडी, वेंगुर्ला येथे घडली. या प्रकरणी मध्यरात्री वेंगुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद जागृती जयेश सरमळकर (मूळ राहणार अणसुर मडकीलवाडी, सध्या राहणार विनायक रेसिडेन्सी, कॅम्प वेंगुर्ला) यांनी दिली आहे.


आरोपी उमेश सरमळकर याने विविध बँका व बचत गटांकडून कर्ज घेतले होते. तसेच त्याला दारूचे व्यसन होते. या कर्जाच्या कारणावरून आणि दारूच्या विषयावरून मयत आई व आरोपी मुलामध्ये वाद व भांडण होते. या कारणासह ती भावाच्या बाजूने जास्त आहे, या साऱ्या रागातून त्याने खून करण्याचे टोकाचे पाऊल उचलले, असा संशय आहे.


सदर खून प्रकरणातील संशयित आरोपी उमेश याच्या विरोधात वेंगुर्ले पोलीस ठाण्यात बीएनएस कलम १०३(३) तसेच शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, २५, २७, २९ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची तत्काळ अटक करण्यात आली. त्याला कुडाळ न्यायालया मध्ये हजर केले असता न्यायाधीशांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Comments
Add Comment

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात

Crime News: रात्री हलवा खाल्ला अन् सकाळी उठलेच नाही..तिघांचा मृत्यु,घडली विचीत्र घटना..!

चंदीगड : हरियाणातील फरिदाबादच्या सरूरपूर भागात एक भयंकर व पाय खालची जमीन हलवणारी घटना घडली आहे. एका कुटुंबातील

बंगळुरूत महिला इंजिनिअरची निर्घृण हत्या; १८ वर्षीय आरोपीने खिडकीतून घरात शिरून ...

बंगळुरू : आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या ३४ वर्षीय महिला इंजिनिअरचा मृत्यू सुरुवातीला अपघात मानला जात होता.

ऑनलाईन गेमिंगमुळे मित्रानेच केली मित्राची हत्या ; ६ महिन्यानंतर सापडला आरोपी मित्र

मुंबई : मित्राच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी 20 वर्षांच्या तरुणाला अटक

Crime News: समलिंगी संबंधातून वाद,नंतर हत्या; नक्की काय घडलं ?

मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक आणि पाया खालची जमीन सरकवून टाकणारी घटना समोर आली आहे. समलिंगी संबंधातील वादातून एका

बीडमधील गोळीबार प्रकरणाचे सीसीटीव्ही फूटेज अखेर समोर ; कोण असेल गुन्हेगार ?

बीड : बीड शहराचा गुन्हेगारीचा डाग पुसला जात नसून त्यात दिवसेंदिवस अधिक भर होत चालली आहे. भरदिवसा शहरात एका