फेडरल बँकेच्या निव्वळ नफ्यातील ४.७% वाढीनंतर शेअरमध्ये 'इतकी' तुफान वाढ

मोहित सोमण: फेडरल बँकेचा तिमाही निकाल जाहीर झाला आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या निव्वळ नफ्यात (Net Profit) इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ४.७% वाढ झाली आहे. ज्यानंतर शेअर ९% पातळीवर उसळला आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यातील ९५५ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये १००० कोटीवर वाढ झाली आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, फेडरल बँकेने तिसऱ्या तिमाहीत आपल्या असेट क्वालिटीत गुणवत्तेच्या निकषांमध्ये लक्षणीय सुधारणा दर्शविली आहे. उपलब्ध माहितीनुसार,स्थूल जीएनपीए (Gross Non Performing Assets NPA) गुणोत्तर तिमाही बेसिसवर१.८३% वरून १.७२% पर्यंत घसरले आहे त्याचप्रमाणे,निव्वळ एनपीए (Net NPA) गुणोत्तर तिमाही बेसिसवर ०.४८% वरून ०.४२% पर्यंत सुधारले आहे. तसेच बँकेच्या एकूण उत्पन्नात (Total Income) इयर ऑन इयर बेसिसवर ७७२४ कोटीवरून वाढत यंदा ७९६७ कोटींवर वाढ झाली आहे. बँकेच्या ऑपरेटिंग नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर १५६९ कोटीवरून १७२९ कोटीवर वाढ झाली आहे.


बँकेच्या डेट टू इक्विटी गुणोत्तर ०.८९ वरून ०.४५ पातळीवर गेले. आरओए (Return on Assets) ०.२९ वरून ०.२९ पातळीवर समान राहिले आहे. माहितीनुसार, ऑपरेटिंग मार्जिनमध्ये इयर ऑन इयर बेसिसवर २०.३२% वरून २१.७०% सुधारणा झाली आहे. बँकेच्या करपूर्व नफ्यात (PBT) इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या वर्षीच्या तिमाहीतील १२७७ कोटी तुलनेत या तिमाहीत १३९६ कोटींवर वाढ झाली आहे. फेडरल बँकेच्या तिमाही निकालानंतर बँकेच्या शेअर्समध्ये ९% वाढ झाली आहे. दुपारी १ वाजेपर्यंत बँकेच्या शेअर्समध्ये ८.८१% वाढ झाली आहे ज्यामध्ये शेअर २६८.६० रुपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे. ५ दिवसात कंपनीच्या शेअर्समध्ये ५.३८% वाढ झाली असून गेल्या महिनाभरात बँकेच्या शेअर्समध्ये २.०४% वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात बँकेच्या शेअर्समध्ये ३६.९१% वाढ झाली असून इयर टू डेट बेसिसवर (YTD) ०.४९% वाढ झाली.

Comments
Add Comment

मध्यम कालावधीसाठी ६ कंपन्यांच्या शेअरला मोतीलाल ओसवालकडून गुंतवणूकदारांना खरेदीचा सल्ला

प्रतिनिधी: आज लघुकालीन व मध्यमकालीन परताव्यासाठी मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने ६ शेअर गुंतवणूकदारांना

पनवेल महापालिकेसाठी मतमोजणी सुरू

पनवेल : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी आज मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या

डहाणू पारनाका-कुरगाव सागरी महामार्गाचा कायापालट

आता डांबरीकरण नव्हे, 'काँक्रिटीकरण' होणार डहाणू : डहाणू आणि पालघर तालुक्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या सागरी

वसई-विरारमधील ७ लाख मतदारांचा कौल कुणाला

महायुती, बहुजन विकास आघाडीत टक्कर विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार महापालिकेच्या ११५ जागांसाठी गुरुवारी मतदान

२९ महापालिकांत महायुतीचाच महापौर

रवींद्र चव्हाण यांचा ठाम विश्वास कल्याण : कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपचे

कल्याण-डोंबिवलीत ४०.०७ टक्के मतदान

मतदानाचा टक्का घसरला; दुपारी वेग वाढला कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत मतदान प्रक्रियेत