मुंबईकरांच्या सेवेचे नवे पर्व

दोन्ही ठाकरेंपेक्षा एकट्या भाजपला अधिक जागा


मुंबई - मुंबईत दोन्ही ठाकरेंच्या एकुण जागांपेक्षा एकट्या भाजपाला जास्त जागांवर विजयी करुन मुंबईकरांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला ही एका नव्या विकास पर्वाची सुरुवात आहे तसेच मुंबईकरांच्या सेवेची ही संधी आहे, अशा शब्दांत मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


मुंबईमध्ये उबाठा आणि मनसेने एकत्र येऊन जेवढ्या जागा लढल्या त्यापेक्षा कमी जागा लढून एकटा भाजपा या दोन्ही पक्षांपेक्षा अधिक जागांवर विजयी झाला आहे. हा मुंबईकरांनी विकासाला दिलेला कौल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केलेल्या विकास कामांच्या बाजूने मुंबईकर उभा राहिला आहे, असे नमूद करतानाच मंत्री शेलार यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, मुंबईकर हो,
आपण भाजपासह महायुतीला दिलेला आशीर्वाद आम्ही अत्यंत नम्रपणे स्वीकारतो
आम्हाला आपण सेवेची ही नवी संधीच दिली आहे.


मुंबईचा विकास व्हावा, हाच तुमचा आणि भाजपाचा ध्यास आहे. आपण आता या नव्या दमदार विकास पर्वाला सुरुवात करु या. त्यासाठी आम्ही झटणार आहोत. आता थांबणार नाही. मुंबईकरांच्या "नम्र सेवकाचा हा शब्द आहे, की, उतणार नाही मातणार नाही मुंबईकरांच्या सेवेचा वसा टाकणार नाही , असे त्यांनी म्हटले आहे.


तसेच त्यांनी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष अमीत साटम यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन ही केले आहे.

Comments
Add Comment

कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी

कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी पॅनल क्र. 1 : बीजेपी - वरुण पाटील ( विजयी ) शिवसेना -

“महायुतीचा धडाका: मुंबईत महापौर आमचाच!

विकासाच्या अजेंड्यावर जनतेची मोहोर मुंबईकरांनी अन्य ब्रँडला नाकारले - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे” ठाणे

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी

मुंबई महापालिका निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी प्रभाग १ - रेखा राम यादव, शिवसेना प्रभाग २ - तेजस्वी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज