६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत ६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असून, याविरोधात मनसेच्या अविनाश जाधव यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. उमेदवार बिनविरोध निवडून आला असला, तरी मतदारांसाठी नोटाचा पर्याय असावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.
मात्र, न्यायालयाने याचिकाकर्त्यांना खडेबोल सुनावत ही याचिका फेटाळून लावली. तुम्ही न्यायालयात सकाळी चुकीचा युक्तिवाद केला, तसेच रिट पिटिशन आणि आधीच्या याचिकेत सार्धम्य असल्याचे सांगितले, मात्र यामध्ये काहीही साम्य आढळून आलेले नाही, त्यामुळे आम्ही याचिकाकर्त्यांना दंड ठोठावत असल्याचे सुरुवातीला न्यायमूर्तींनी सांगितले.
ही याचिका इतर प्रलंबित याचिकांसारखीच असल्याचे नमूद करण्यात आले. मात्र, सुनावणीसाठी याचिका पुकारण्यात आल्यानंतर ऑनलाईन उपस्थित असलेले असीम सरोदे यांनी सांगितले की, ही याचिका तत्सम नसून निवडणुकीशी संबंधित आहे. यामुळे खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. चुकीचे विधान केल्याबद्दल आम्ही तुमच्यावर दंड लावणार आहोत, असे हायकोर्टाकडून सांगण्यात आले. एखाद्या पक्षकारासाठी अशी चुकीची माहिती देण्यामागे तुमची घाई काय होती?, असा सवालही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना विचारला. शेवटी न्यायालयाने दंड न आकारता ही याचिका फेटाळून लावली.

किती नगरसेवक बिनविरोध ?


राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये मतदान होण्यापूर्वीच ६६ उमेदवार विजयी झाले आहेत. निवडणुका बिनविरोध करण्यात भाजपने आघाडी घेतली असून, भाजपचे ४४ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यापाठोपाठ निवडणुका बिनविरोध करण्यात शिवसेनेने दुसरा क्रमांक पटकावला आहे. शिंदेंच्या शिवसेनेते तब्बल १९ नगरसेवक बिनविरोध विजयी झाले आहेत. कल्याण-डोंबिवलीत भाजपचे सर्वाधिक १४ उमेदवार, तर शिवसेनेचे ६ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे २, तर मालेगावमधून इस्लाम पार्टीचा एक उमेदवार बिनविरोध विजयी झाला आहे.
Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात ८ एप्रिलपासून बदल; लाईन ९ व २ बी सेवेत, प्रवाशांसाठी अधिक सुलभ व जलद सेवा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती

Chandrashekhar Bawankule: अजित दादांची सावली आता बारामतीत सुनेत्रा माऊली; बावनकुळेंनी जागवल्या ३२ वर्षांच्या ऋणानुबंधांच्या आठवणी

बारामती: "ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य