Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत विजयी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) नगरसेविका शाहू कांबळे यांचा उपचाराअभावी मृत्यू झाला. निवडणूक जिंकून अवघे २५ दिवस उलटले असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला.


मंगळवारी पहाटे अचानक शाहू कांबळे यांना छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. प्रकृती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच नातेवाईकांनी तात्काळ त्यांना अहमदपूर शहरातील खासगी रुग्णालयांत दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पहाटेची वेळ असल्याने अनेक खासगी रुग्णालये बंद होती, तर काही ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नव्हते. तब्बल एक तास उपचारासाठी वणवण केल्यानंतर अखेर त्यांना शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.


दुर्दैवाने, तोपर्यंत फार उशीर झाला होता. शासकीय रुग्णालयातही तातडीचे उपचार मिळण्यास विलंब झाल्याने शाहू कांबळे यांची प्राणज्योत मालवली. “१५ ते २० मिनिटे आधी योग्य उपचार मिळाले असते, तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता,” अशी भावना त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. शाहू कांबळे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्या होत्या. त्यांचा २०१७ च्या निवडणुकीत केवळ १२ मतांनी पराभव झाला होता. मात्र त्यांनी जनसंपर्क आणि पक्षकार्य सुरूच ठेवले. यंदाच्या निवडणुकीत सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी त्यांच्यावर विश्वास टाकत प्रचारात स्वतः लक्ष घातले आणि अखेर शाहू कांबळे मोठ्या फरकाने विजयी झाल्या.


लोकप्रतिनिधीच्या मृत्यूने पुन्हा एकदा ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेच्या दयनीय अवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वेळेवर उपचार मिळाले असते तर हा बळी टाळता आला असता, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

Comments
Add Comment

मंत्री नितेश राणेंची विराट हिंदू संमेलनाला उपस्थिती; 'हिंदू एकतेची ऊर्जा आणि धर्माभिमान खरोखर प्रेरणादायी'

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे सकल हिंदू समाजाकडून विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले.

३० मार्च ते ४ एप्रिल दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाचे नवीन सत्र

मुंबई: ३० मार्चपासून राज्यात आभाळी हवामान आणि दुपारनंतर होणाऱ्या वादळी पावसाचे नवीन सत्र सुरू होण्याचा अंदाज

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंक

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तिपत्र  मुंबई : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

Crime News : यवतमाळ हादरले! अर्धवट जळालेल्या 'त्या' तरुणीच्या मृतदेहाचं गूढ उकललं; पहिला गळा आवळला अन् मृतदेह जाळून....

यवतमाळ : जोडमोहा शिवारातील तासलोट जंगलात १५ दिवसांपूर्वी एका २६ वर्षीय तरुणीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह

Jyoti waghmare : ज्यांना पक्ष सांभाळता येत नाही, ते राज्य काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंनी 'साहेब' म्हटले, पण उद्धव ठाकरेंनी...; ज्योती वाघमारेंचा घणाघात

नांदेड : राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे सध्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, यावेळी त्यांनी शिवसेना

निवासी व व्यावसायिक आस्थापनांना एलपीजी व पीएनजी गॅसचा अधिक चांगला व सुलभ पुरवठा उपलब्ध करून देणे, तसेच निश्चित कालावधीत पीएनजी सेवांचा विस्तार करणेबाबत दिल्लीत बैठक संपन्

राज्यात पीएनजी नेटवर्क वाढीसाठी केंद्र शासनाकडून तांत्रिक सहाय्य तसेच पायाभूत सुविधा उभारणीसाठी आर्थिक पाठबळ