मोहित सोमण: आज नवा कल सोन्यात पाहिला मिळाला आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, सोन्याच्या २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ८२ रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १३१२५ रूपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ६१ रूपयाने घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १४१३८, २२ कॅरेटसाठी १३१२५ रूपये, १८ कॅरेटसाठी १०७३९ रूपयांवर पोहोचले. प्रति तोळा दर २४ कॅरेटमागे ८२० रूपयांनी, २२ कॅरेटमागे ७५० रूपयांनी, १८ कॅरेटमागे ६१० रूपयांनी घसरला आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १४३१८०, २२ कॅरेटसाठी १३१२५० रूपये, १८ कॅरेटसाठी १०७३९० रूपयांवर पोहोचले आहेत. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १४३१८, २२ कॅरेटसाठी १३१२५, १८ कॅरेटसाठी ११०९० रूपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये ( Multi Commodity Exchange MCX) सोन्याच्या निर्देशांकात सकाळपर्यंत ०.६७% वाढत १४३२०१ रूपयांवर पोहोचले आहेत.
जागतिक पातळीवरील अस्थिरतेचा सलग चार वेळा फटका बसल्यानंतर नवा 'ट्रिगर' बाजारात नसल्याने युएस अर्थव्यवस्थेत सुधारणा दिसत असल्याने सोन्यात आज मात्र घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत काल उशीरा झालेली रूपयात मर्यादित घसरण तसेच युएस इराण यांच्यासह युएस ग्रीनलँड डेन्मार्क यांच्यातील अपेक्षित संवादाची पार्श्वभूमी तयार झालेली असताना ही जागतिक घसरण झाली. याशिवाय युएस व्हेनेझुएला या वादात नवी फोडणी न मिळाल्याने बाजारात काहीशी स्थिरता मिळाली असून मुख्यतः आज जाहीर झालेल्या माहितीनुसार नोव्हेंबरमध्ये अपेक्षित आकडेवारीपेक्षा ०.३% वाढ युएस अर्थव्यवस्थेत झाली. परिणामी बाजारातील व कमोडिटीतील दबाव नियंत्रण झाल्याने सोन्यात घसरण झाली. गेल्या काही दिवसांपासून सोन्याकडे फेड निकालाची अपेक्षा असताना सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जात आहे. अशातच मोठ्या मागणीत वाढ झालेल्या सोन्यात वाढ होतच असताना आज मागणीत स्थिरता आली. पर्यायाने आज मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांंनी सोन्यात नफा बुकिंग केल्याचे दिसून येत आहे.
मजबूत अमेरिकन आकडेवारीसह भूराजकीय तणाव कमी झाल्यामुळे व नव्या नसलेल्या ट्रिगरमुळे सोन्याच्या किमती ४,६४३ डॉलरच्या विक्रमी उच्चांकावरून घसरून ४,५८० डॉलरच्या दिशेने खाली आल्या आहेत. युएस बाजारातील आर्थिक रिटेल सेल्स आकडेवारी, उत्पादक किंमत निर्देशांकाची (PPI) भक्कम आकडेवारी आणि बेरोजगारी दर नियंत्रित राहिल्यामुळे यामुळे फेडरल रिझर्व्ह दीर्घकाळासाठी व्याजदर अपरिवर्तित ठेवेल या अपेक्षांना गुंतवणूकदारांकडून बळकटी आज मिळाली आहे परिणामी सोन्यावर दबाव आला. मजबूत अमेरिकन डॉलरने मागणी आणखी कमी केली. तज्ञांच्या मते तात्काळ भूराजकीय धोके कमी झाल्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीचा ओघ मंदावला असला तरी, फेडरल रिझर्व्हच्या स्वातंत्र्याबद्दलच्या चिंता आणि मध्य पूर्वेतील अनिश्चितता यामुळे सोन्याच्या किमतींना अंतर्गत आधार मिळत आहे.