घरोघरी जाऊन प्रचार करण्याच्या तरतूदीसंदर्भातील आदेश जुनाच

मुंबई : महानगरपालिका निवडणूकांच्या प्रचाराची समाप्ती झाल्यानंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने कुठलाही नवीन आदेश निर्गमित केलेला नाही. त्यासंदर्भातला आदेश जुनाच असून तो राज्य निवडणूक आयोगाने १४ फेब्रुवारी २०१२ मध्येच निर्गमित केलेला आहे.


जाहीर प्रचाराच्या समाप्तीनंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने नवीन नियम लागू केला असल्याचे वृत्त समाजमाध्यमांसह विविध माध्यमातून प्रसारित होत आहे; परंतु हे वस्तुस्थितीला धरुन नाही. याबाबतचा आदेश जुनाच आहे. त्या १४  फेब्रुवारी २०१२ रोजीच्या आदेशानुसार जाहीर प्रचार समाप्तीनंतर उमेदवार हे मतदान केंद्राच्या १०० मीटर बाहेर मतदारांना भेटून आणि घरोघरी जाऊन प्रचार करु शकतील; परंतु माईकचा वापर करता येणार नाही आणि उमेदवारांना समुहानेदेखील फिरता येणार नाही

Comments
Add Comment

मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वाहतूक नियोजनात बदल; काही मार्गांवर प्रवेश मर्यादित

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार असून, या प्रक्रियेच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी

मशीदीवरचे भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देऊन उद्धव ठाकरेंनी प्रचार केला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप; कुणाचाही महापौर झाला तरी आम्ही भोंग्यांना परवानगी देणार नाही मुंबई :

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक

BMC Election 2026 : महापालिका निकाल प्रक्रियेत बदल; मुंबईत मतमोजणीसाठी नव्या नियमांची अंमलबजावणी

मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. १५ जानेवारी रोजी मतदान

देशातील क्रमांक दोन आयटी कंपनीचा तिमाही निकाल जाहीर इन्फोसिसच्या निव्वळ नफ्यात २% घसरण

मोहित सोमण: इन्फोसिस कंपनीने आपला तिमाही निकाल आज जाहीर केला. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार,

Devendra Fadnavis : परप्रांतियांना थोबाडीत मारणं म्हणजे मुंबईचा विकास नव्हे; मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर बोचरा वार

वरळीच्या बीडीडी चाळीतून भरला प्रचाराचा हुंकार मुंबई : महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा