वारियाने कुंडल हाले
वारियाने कुडल हाले । डोळे मोडित राधा चाले ।।
राधेला पाहुनि भुलले हरी । बैल दुभवी नंदाघरी ॥
फणस जंबीर कर्दळी दाटा। हाती घेऊन नारंगी फाटा॥ हरि पाहून भुलली चित्ता। राधा घुसळी डेरा रिता॥ ऐसी ऐसी आवडी मिनली दोघां । एकरूप झाले अंगा ॥
मन मिळालेसे मना । एका भुलला जनार्दना ॥
संत एकनाथांच्या गौळणी प्रसिद्ध आहेत. गोकुळातील गोपगोपींची कृष्ण खोड्या काढीत असे. गौळणी यशोदेकडे कृष्णाची तक्रार करीत पण कृष्णाशिवाय त्यांनाही चैन पडत नसे. कृष्णावर त्या काया-वाचा-मने लुब्ध होत्या.'भुलविले वेणुनादे| वेणू वाजविला गोविंदे ॥ अशी त्यांची अवस्था झाली होती.
राधा तर पूर्ण कृष्णरंगात रंगलेली. राधा म्हणजे अवतीची परिपूर्ण धारा. तिचं अवघं अस्तित्वच कृष्णमय. कृष्णाशिवाय ती अधुरो भाणि राधेशिवाय कृष्ण. राधा अवघ्या विश्वातील भक्ती प्रेमाचं एक प्रतीक आहे.
या रचनेते एकनाथांनी राधा आणि कृष्ण यांच्या संबंधांचे सुंदर वर्णन केले आहे. यमुनेच्या पाण्यावरून येणाऱ्या वाऱ्यामुळे राधेच्या कानातील कुंडल हलत आहेत. ती आपल्याच धुंदीत आजूबाजूला पाहात होळे मोडीत चालली आहे. तिला पाहताच कृष्णालाही भूल पडली. मधुरा भक्तीचे हे सुंदर वर्णन आहे. श्रृंगारातही नाथांनी विनोदाची पखरण केली आहे. कृष्णाला राधेचे एवढे वेड लगले त्या धुंदीत तो गाईंऐवजी बैलाचे दूध काढण्यारानी गेला. राधेचीही अवस्था तशीच झाली. तीही आपल्या घरी जाऊन रिकामाच डेसा घुसळू लागली. त्या दोघांची मने एकमेकात मिसळून गेली होती. जसे दुकनाय सदगुरूंना भुलले तसेच राधा नि कृष्ण एकमेकांना भुलले.
प्रेमात तर मनच महत्त्वाचे. जो मन जिंकतो तो प्रिय सखा होतो. जी मन जिंकते ती प्रेमिका. हरी राधेचा प्रिय सखा याणि राधा हरीची प्रेमिका. तिच्या हृदयात त्याचा ठाव आणि त्याच्या हृदयात तिचा भाव. प्रेमाचे हे असे पूर्ण अद्वैत. यात राधा आपले राधापण आणि कुष्ण आपले कृष्णपण पूर्णपणे विसरले होते.
राधा-कृष्णाचे हे अलौकिक भक्तीचे नाते ही भारतीय भक्तीपरंपरेतील एक सुंदर रूपक आहे. एक प्रेरणादायी उदात्त शिल्प आहे.