मुंबई इंडिन्सचा गुजरात जायंट्सवर सात बळी राखून विजय

कर्णधार हरमनप्रित कौरची आक्रमक खेळी


नवी मुंबई : विजयासाठी १९३ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रित कौर हिने ४३ चेंडूमध्ये ७१धावांची नाबाद खेळी करत चौकाराने संघाचा विजय साकारला. दुसऱ्या बाजूने निकोला कॅरीने २३ चेंडूमध्ये नाबाद ३८ धावा केल्या. चौथ्या विकेटसाठी नाबाद ८४ धावांची भागिदारी करत कौर व कॅरीने संघाला विजय मिळवून दिला. सात बळी राखून मुंबई इंडियन्सने स्पर्धेतील पहिला विजय मिळविला.


मुंबईच्या अमनज्योत कौरने २६ चेंडूत ४० धावा करत संघाच्या विजयामध्ये आपले योगदान दिले. गुजरात जायंट्सने सामन्यात तीन झेल सोडत गच्चाळ क्षेत्ररक्षण करत पराभवाला हातभार लावला. महिला आयपीएल स्पर्धेत नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या गुजरात जायंट्सने २० चौकार व ७ षटकारांच्या मदतीने २० षटकांअखेर ५ गडी बाद १९२ धावा केल्या आहेत. गुजरात जायंट्सने एकाही खेळाडूला अर्धशतक झळकावता आले नसले तरी सांघिक कामगिरीच्या बळावर साडे नऊच्या सरासरीने मुंबई इंडियन्ससमोर तगडे आव्हान त्यांनी निर्माण केले. मुंबईला हा सामना जिंकण्यासाठी १९३ धावा करायच्या आहेत.


गुजरात जायंट्सकडून खेळताना जॉर्जिया वारेहमने सर्वांधिक ४३धावा केल्या. त्यानंतर भारती फुलमाळीच्या ३६ धावा, कानिका आहूजा ३५ धावा, बेथ मुनी ३३ धावा. कर्णधार गॉर्डनरच्या २० धावांनी धावसंख्येला
आकार मिळाला.

Comments
Add Comment

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत

आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका

महिला प्रीमियर लीग: हरमनप्रीत-सायव्हरचा झंझावात

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी विजय मुंबई : वानखेडे स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या तीसऱ्या

बडोद्यात भारताचा न्यूझीलंडविरुद्ध 'विराट' विजय

बडोदा : भारताने न्यूझीलंड विरूद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकत विजयी सलामी दिली.

टी-२० विश्वचषकातून वगळल्यानंतर अखेर शुभमनचे मौन सुटले

बडोदरा : भारतीय कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने २०२६ च्या टी-२० विश्वचषक संघातून वगळल्याबद्दल