जर्मनीच्या कैदेत असलेल्या अरिहासाठी आईने ओलांडली भाषेची भिंत

लेकीला परत आणण्यासाठी आई-वडिलांचा ४० महिन्यांपासून लढा


नवी दिल्ली : आपल्या काळजाच्या तुकड्याला, पाच वर्षांच्या अरिहा शाहला भारतात परत आणण्यासाठी तिचे आई-वडील गेल्या ४० महिन्यांपासून लढा देत आहेत. अरिहा आता केवळ जर्मन भाषा बोलत असल्याने, तिच्याशी संवाद साधता यावा म्हणून आई धारा शाह यांनी स्वतः जर्मन भाषा आत्मसात केली आहे. आता जेव्हा हे कुटुंब भेटते, तेव्हा धारा या पती भावेश आणि मुलगी अरिहा यांच्यातील 'दुभाषी' म्हणून काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भारत दौऱ्यावर आलेल्या जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांच्याकडे अरिहाचा मुद्दा पुन्हा एकदा लावून धरला. भारताने हे प्रकरण आता केवळ कायदेशीर नसून 'मानवतावादी' असल्याचे स्पष्ट केले आहे. अरिहाच्या पालकांना सध्या महिन्यातून केवळ दोनदा तिला भेटण्याची परवानगी आहे. बर्लिनमधील केंद्रावर लेकीला १० मिनिटे पाहण्यासाठी हे दाम्पत्य तासनतास प्रवास करून पोहोचते.अरिहा अवघ्या सात महिन्यांची असताना जर्मनीच्या 'जुगेंडम' (युथ वेल्फेअर ऑफिस)ने तिला ताब्यात घेतले होते. जर्मन वातावरणात वाढल्यामुळे ती तिची मातृभाषा विसरली आहे. मात्र, लेकीशी असलेले नाते तुटू नये म्हणून धारा शाह यांनी अथक प्रयत्नांनी जर्मन भाषा शिकून तिच्याशी संवाद सुरू ठेवला आहे.


अरिहाचे वडील भावेश शाह हे सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून जर्मनीला गेले होते. अरिहा जेव्हा सात महिन्यांची होती, तेव्हा तिच्या गुप्तांगाला चुकून दुखापत झाली. जेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तेव्हा डॉक्टरांनी पालकांवर बाल लैंगिक शोषणाचा संशय व्यक्त केला. जर्मनीच्या 'जुगेंडम' (युथ वेल्फेअर ऑफिस)ने तत्काळ अरिहाला पालकांपासून हिरावून घेतले आणि 'फोस्टर केअर'मध्ये (सरकारी संगोपन केंद्र) ठेवले. फेब्रुवारी २०२२ मध्ये जर्मनीच्या पोलिसांनी तपास पूर्ण करून सांगितले की, पालकांकडून कोणताही गैरप्रकार झालेला नाही. मात्र, तरीही अरिहाला पालकांकडे सोपवण्यात आले नाही. जर्मनीच्या कोर्टाचे म्हणणे होते की, पालकांनी निष्काळजीपणा दाखवला आहे, त्यामुळे मुलगी त्यांच्याकडे सुरक्षित नाही. अरिहा गेल्या साडेतीन वर्षांपासून जर्मन फोस्टर केअरमध्ये आहे. तिथे ती फक्त जर्मन भाषा बोलणाऱ्या लोकांसोबत वाढली. परिणामी, ती तिची मातृभाषा (गुजराती/हिंदी) विसरली आहे. यामुळेच तिची आई धारा शाह यांनी स्वतः जर्मन भाषा शिकली आहे, जेणेकरून त्या आपल्या लेकीशी संवाद साधू शकतील.

Comments
Add Comment

Madhya Pradesh News : मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडला अन्....मध्य प्रदेशात मारहाण, लाठीमार आणि महामार्गावर चक्काजाम

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर

Sabarimala Temple : सबरीमाला मंदिरात तूप विक्रीत लाखो रुपयांचा महाघोटाळा! केरळ उच्च न्यायालयाचे कठोर पाऊल; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

तिरुअनंतपुरम : केरळमधील जगप्रसिद्ध सबरीमाला मंदिरात सोन्याच्या दरोड्यानंतर आता 'तूप घोटाळा' समोर आल्याने खळबळ

वर्षभरात १ लाख व्हिसा रद्द; नियम मोडणाऱ्यांना दणका

८ हजार भारतीय विद्यार्थ्यांवरही टांगती तलवार नवी दिल्ली : अमेरिकेला अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि बेकायदेशीर

'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच

लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा पाकला इशारा नवी दिल्ली : "भारतीय लष्कर सीमेवर अत्यंत सतर्क असून शत्रूच्या

कुत्रा चावल्यास मोबदला राज्य सरकारने द्यावा!

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नवी दिल्ली : कुत्र्यांनी घेतलेला चावा किंवा हल्ल्यामुळे जर कुणी जखमी झाला किंवा

जलद डिलिव्हरीच्या वेळापत्रकावर सरकारची भूमिका; क्विक कॉमर्स कंपन्यांना मार्गदर्शक सूचना

नवी दिल्ली :ऑनलाइन डिलिव्हरी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांच्या सुरक्षिततेबाबत केंद्र सरकारने