ठाण्यात 'जय श्रीराम'वाला महापौर बसवा; नाहीतर 'हिरवे' गुलाल उधळतील!

मंत्री नितेश राणे यांचा इशारा


ठाणे : ''एकीकडे संविधानाच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे धर्माच्या नावाने मतदानाचे फतवे काढायचे, ह्या व्होट जिहादचा पर्दाफाश आम्ही केला आहे. तेव्हा, राष्ट्रभक्त हिंदु समाजाने १५ तारखेला जागरूक राहुन मतदान करावे, आणि ठाण्यात "जय श्रीराम" वाला महापौर बसवा, नाही तर हे हिरवे गुलाल उधळतील, असा सावधतेचा इशारा राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे. ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५ चे भाजप - शिवसेना - रिपाई महायुतीचे उमेदवार सीताराम राणे, परिषा सरनाईक आणि जयश्री डेव्हीड यांच्या प्रचारार्थ मंगळवारी काढण्यात आलेल्या रॅलीत मंत्री नितेश राणे सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.


शिवाईनगर येथील संकटमोचक हनुमान मंदिर येथून सुरूवात झालेल्या ह्या रॅलीमध्ये महायुतीच्या तिन्ही उमेदवारांसह आमदार संजय केळकर, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करीत देवाभाऊंच्या गीत वाजवत ही रॅली तब्बल दोन तास चालली.


माध्यमांशी बोलताना मंत्री नितेश राणे यांनी, व्होट जिहादवर प्रखर भाष्य केले. ''आम्ही मुंबई - ठाणे या शहरांच्या विकासावर निवडणुका लढवतोय तर, दुसऱ्या बाजुला अजान बंद करणाऱ्यांच्या विरोधात, मशिदीविरोधात बोलणाऱ्यांच्या विरोधात मतदान करा. धर्माच्या नावाने मतदान मागितलं जात आहे. याप्रकारे भाजपविरोधात मतदान करण्याची मागणी करणे, हा एक प्रकारे व्होट जिहाद असुन हेच मी जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. एका बाजुला हिंदु समाजाला डिवचायचे आणि दुसऱ्या बाजुला मशिद आणि अजानच्या नावाने मते मागायची, एकीकडे संविधानाच्या गोष्टी करायच्या दुसरीकडे धर्माच्या नावाने मतदानाचे फतवे काढायचे,असे यांचे कारनामे सुरू आहेत. तेव्हा, राष्ट्रभक्त हिंदु समाजाने जागरूक राहुन १५ तारखेला मतदान करावे.


हिंमत असेल तर मोहल्यातील मतदारांचे हातपाय तोडा:


बोगस मतदारांना मारणार म्हणणाऱ्या मनसेला प्रत्युत्तर देताना मंत्री नितेश राणे यांनी, हिंमत असेल तर बेहरामपाडा, नळबाजार येथील मोहल्ल्यामध्ये बुरखे घालुन मतदान करतात, तिथे जाऊन त्यांचे हातपाय तोडा तेव्हा कळेल बाळासाहेबांच्या विचारांचे कोण? असे आव्हान दिले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जनतेने २०१४, २०१९ आणि २०२४ मध्ये कौल दिला आहे, मनसेसारखा शुन्य मिळालेला नाही. अशी खिल्लीही उडवली.

Comments
Add Comment

Thane : राज्य महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन

ठाणे : शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

Thane News : कासारवडवलीतील ७८० मीटर डीपी रस्त्याचा मार्ग मोकळा होणार; अण्णा बनसोडेंचे अधिकाऱ्यांना निर्देश

ठाणे : ठाण्यातील कासारवडवली-मोगरपाडा परिसरातील ७८० मीटर लांबीच्या डीपी रस्त्याचे काम स्थानिक नागरिकांशी चर्चा

Drugs on Station : रेल्वे स्टेशनवरील पाण्याच्या कूलरमध्ये नशेची इंजेक्शन

कल्याण : चोरी, नशेखोरांचा उपद्रव आणि विविध गैरप्रकारांमुळे यापूर्वी चर्चेत आलेले कल्याण जंक्शन रेल्वे स्थानक

Eknath Shinde : गणेशोत्सवाआधी खड्डे बुजवा! मनपांना उपमुख्यमंत्र्यांचे आदेश; उत्कृष्ट काम करणाऱ्या पालिकेला बक्षीस

खड्डेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्व महानगरपालिकांना कामाला लागण्याचे निर्देश पावसाळ्यात तातडीने

Mira Road : स्कूल व्हॅन रस्त्यावरून जात असताना मेट्रोचा स्लॅब कोसळला, आणि...

मिरा रोड : मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये मेट्रोशी संबंधित कामं प्रगतीपथावर आहेत. मेट्रोच्या कामांमुळे काही

Dombivli Local Train Accident : डोंबिवली लोकलच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू; पोस्टमार्टेम रिपोर्टने तपासाला नवे वळण

डोंबिवली : डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर