मोहित सोमण: काल केंद्र सरकारने १० मिनिटात होम डिलिव्हरीला लाल सिग्नल दाखवल्यानंतर सुरुवातीला क्विक कॉमर्स कंपनीच्या शेअर्समध्ये किरकोळ घसरण झाली आहे. सकाळच्या सत्रात स्विगी शेअर्समध्ये २% घसरण इंट्राडे झाली असताना मात्र सकाळच्या सत्रात इटर्नल (Zomato) शेअरमध्ये १% पातळीवर काही काळानंतर वाढ झाली आहे. दरम्यान एफएसएन इ कॉमर्स (FSN E Commerce) शेअरमध्येही १% पातळीवर घसरण झाली.सहाजिकच इतर महत्वाच्या शेअर्समध्ये घसरण झाली असताना इटर्नल शेअरमध्ये वाढ का झाली हा प्रश्न स्वाभाविक आहे.काल शेअर्समध्ये विश्लेषकांनी इटर्नल शेअरमध्ये बुलिश पॅटर्न दाखवल्याने आज शेअरविषयी सकारात्मकता निर्माण झाली. त्यामुळे कालच्या केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानंतरही कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. Stockedge.com कंपनीने आपल्या डेटा पँटर्नमध्ये कंपनीच्या शेअरला आरएसआय (Relative Strength Index RSI) ५० पातळीपेक्षा अधिक झाल्याचे दाखवले होते. कंपनीच्या आगामी तिमाही निकालांच्या पार्श्वभूमीवर ही उत्सुकता निर्माण झाल्याने कंपनीचा बुलिश पॅटर्न कायम राहिला असला तरी युबीएस (UBS) ब्रोकरेज कंपनीने शेअरला बाय कॉल दिल्याने शेअरला आणखी मागणी निर्माण झाली.
ब्रोकरेजने पुढील दोन ते तीन वर्षांसाठी इटरनलसाठी समायोजित ईबीटा (Adjusted EBITDA) अंदाजांमध्ये १०-१८% आणि स्विगीसाठी १२-२८% कपात नोंदवली आहे. तरीही कंपनीने म्हटले आहे की, शेअरच्या किमतींमधील अलीकडील घसरण असली तरीही मजबूत वाढीचा दृष्टिकोन यामुळे ते या क्षेत्राबद्दल सकारात्मक आहेत.त्यामुळे एकीकडे वाढ झालेली असताना ब्रोकरेज फर्मने क्विक कॉमर्स क्षेत्रावरील आपल्या अहवालात म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांत स्पर्धा तीव्र झाली आहे आणि नेटवर्क विस्तार सुरू असतानाही सवलतींचे प्रमाण वाढले आहे. त्यात पुढे म्हटले आहे की, फूड डिलिव्हरी क्षेत्राची वाढ सुधारत आहे, तर या क्षेत्रातील स्पर्धा साधारणपणे स्थिर आहे. एकंदरीतच ३३ विश्लेषकांनी इटरनलवर विश्लेषण केले आहे, त्यापैकी २९ जणांनी 'बाय' (खरेदी) रेटिंग दिले आहे, तर चौघांनी 'सेल' (विक्री) करण्याची शिफारस केली आहे.
इटर्नलचा शेअर गेल्या ५ दिवसात ५.५६% उसळला असून गेल्या महिनाभरात शेअर ०.५०% कोसळला आहे. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये २७.१२% वाढ झाली असून इयर टू डेट बेसिसवर (YTD) कंपनीच्या शेअर्समध्ये ५.३८% वाढ नोंदवली आहे. सकाळच्या सत्रात इतर शेअर्समध्ये दुपारी १२.२० वाजेपर्यंत ब्रेनबीज सोलूशन (०.४१%), पेटाईम कम्युनिकेशन (२.८७%) समभागात वाढ झाली असून एफएसएन इ कॉमर्स शेअरमध्ये घसरण झाली आहे.