दिशा पाटनी सध्या लोकप्रिय पंजाबी गायक तलविंदरला डेट करत असल्याच्या चर्चा जोरात सोशल मिडीयावर सुरू आहेत. तलविंदर हा आपल्या हटके स्टाईलमुळे ओळखला जातो. विशेष म्हणजे तो कधीही सार्वजनिक ठिकाणी आपला चेहरा उघड करत नाही. सोशल मीडिया असो किंवा स्टेज परफॉर्मन्स, तो कायम मास्क किंवा फेस पेंटच्या माध्यमातून आपली ओळख लपवतो. याच कारणामुळे तो चाहत्यांमध्ये आणखी रहस्यमय ठरला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तलविंदर हा दिशापेक्षा सुमारे सहा वर्षांनी लहान आहे. त्याचा जन्म २३ नोव्हेंबर १९९७ रोजी अमृतसर येथे झाला. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये वाढ झाल्यामुळे त्याच्या संगीतावर पाश्चात्य संगीताचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. तो केवळ गायकच नाही, तर गीतकार आणि संगीत निर्माता देखील आहे. त्याने प्रसिद्ध रॅपर हनी सिंगसोबतही काम केले आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे तब्बल ६.७ दशलक्ष फॉलोअर्स असूनही, त्याच्या एकाही फोटोमध्ये त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नाही.
दरम्यान, दिशा पाटनीच्या लव्ह लाईफची चर्चा यापूर्वीही अनेकदा झाली आहे. तिचं नाव सर्वाधिक अभिनेता टायगर श्रॉफसोबत जोडलं गेलं होतं. काही वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. याशिवाय, तिचं नाव टीव्ही अभिनेता पार्थ समथान, तसेच अलेक्झांडर अलेक्स इलिच यांच्यासोबतही जोडलं गेलं. काही काळ ती त्यांच्यासोबत सार्वजनिक ठिकाणी दिसली होती. विशेष म्हणजे, काही काळासाठी तिचं नाव आदित्य ठाकरे यांच्याशीही जोडलं गेलं होतं.
मात्र, तलविंदरसोबतच्या नात्याबाबत दिशा किंवा तलविंदर यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे.