मुरबाड :मुरबाड तालुक्यातील धसई येथे १५ जानेवारी २०२६ रोजी भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सेवा सहयोग फाऊंडेशन आणि आदित्य बिर्ला कॅपिटल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या ४ वर्षांपासून ‘फिरती विज्ञान प्रयोगशाळा’ उपक्रम यशस्वीपणे राबवला जात आहे. दरवर्षी जिल्हा परिषद शाळा, शासकीय आश्रम शाळा आणि विविध हायस्कूलसाठी आयोजित होणाऱ्या या प्रदर्शनात शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होतात. यावर्षी हे विज्ञान प्रदर्शन रायबॉल, सह्याद्री व्हिला येथे सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत होईल. सर्व शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या विज्ञान प्रदर्शनाला उपस्थित राहून सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आ