आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका निर्माण झाला असून, विराट कोहली पुन्हा एकदा या सिंहासनावर विराजमान होण्याची चिन्हे आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या सामन्यानंतर क्रमवारीची समीकरणे वेगाने बदलली आहेत.


भारतीय क्रिकेट संघाने सन २०२६ ची दमदार सुरुवात केली आहे. ११ जानेवारी रोजी वडोदरा येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडवर चार गडी राखून विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा ‘नंबर वन’ फलंदाज बनू शकतो, तर रोहित शर्माच्या रेटिंगमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. आयसीसीची नवीन अधिकृत क्रमवारी जाहीर झाल्यानंतर यावर शिक्कामोर्तब होईल.
आयसीसीने शेवटची एकदिवसीय क्रमवारी ६ डिसेंबर २०२५ रोजी अपडेट केली होती. नवीन वर्षातील पहिल्या सामन्यासह आता खेळाडूंच्या रेटिंगमध्ये बदल होणार आहेत. शेवटच्या अपडेटनुसार, रोहित शर्मा ७८१ रेटिंगसह पहिल्या तर विराट कोहली ७७३ रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर होता.


न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रोहित शर्माने आक्रमक सुरुवात केली, मात्र तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. रोहितने २९ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २६ धावा केल्या. याउलट, विराट कोहलीने आपल्या लौकिकास साजेसी फलंदाजी केली. विराटचे शतक अवघ्या ७ धावांनी हुकले असले, तरी त्याने ९१ चेंडूत ९३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. विराटने १०२.२० च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या, तर रोहितचा स्ट्राइक रेट ८९.६६ इतकाच राहिला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेचा दुसरा सामना १४ जानेवारी रोजी म्हणजेच बुधवारी खेळवला जाणार आहे. योगायोगाने त्याच दिवशी आयसीसी आपली क्रमवारी अपडेट करणार आहे. बुधवारी (दि. १२) जाहीर होणाऱ्या या क्रमवारीत नक्की कोणाचे वर्चस्व राहते, याकडे आता क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.


रोहित शर्माची दोन क्रमाकांनी होणार घसरण


जुन्या क्रमवारीनुसार रोहित आणि विराट यांच्यात केवळ ८ रेटिंग गुणांचा फरक होता. ताज्या कामगिरीनंतर हा फरक भरून निघणार असून विराट कोहली ८०० रेटिंग गुणांच्या समीप पोहोचण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, तिसऱ्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेलनेही ८४ धावांची खेळी केली आहे. त्यामुळे नवीन क्रमवारीत मिचेल दुसऱ्या स्थानावर झेप घेऊन रोहित शर्माची तिसऱ्या क्रमांकावर घसरण होण्याची देखील दाट शक्यता आहे.

Comments
Add Comment

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

IPL 2026 Avesh Khan : लखनऊच्या विजयावरून वाद, आवेश खानच्या 'त्या' कृतीमुळे सनरायझर्स नाराज

मुंबई : रविवार ५ एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या सामन्यात सनरायझर्स

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुची चेन्नई सुपर किंग्सवर 43 धावांनी मात

बंगळूरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाने चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाचा ४३ धावांनी पराभव केला. आयपीएल

FIDE Candidates Tournament 2026 : भारतीय ग्रँडमास्टर वैशालीचा सलग दुसरा विजय

सायप्रस : भारतीय ग्रँडमास्टर आर. वैशालीने फिडे कॅन्डिडेट्स टूर्नामेंट २०२६ च्या सातव्या फेरीत शानदार कामगिरी

Mohammed Shami : ज्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगला त्यानेच...; झहीर खानला पछाडत शमीने रचला नवा विक्रम!

आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी (५ एप्रिल) डबल हेडर सामन्यांचा थरार रंगला असून हैदराबादच्या मैदानावर झालेल्या

Bangladesh Cricket Board : बांगलादेश क्रिकेट बोर्डात खळबळ, तीन संचालकांचा राजीनामा

बांगलादेश क्रिकेट बोर्डात (बीसीबी) गोंधळाचे वातावरण आहे. ढाका येथे झालेल्या प्रदीर्घ संचालक मंडळाच्या