पीएमपीएमएल प्रशासनाचा मोठा निर्णय; 'हे' दोन दिवस प्रवाशांच्या सेवेसाठी केवळ ६०० बस शिल्लक


पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मतदान प्रकिया सुरुळीत पर पाडण्यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाचा मोठा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने आपल्या ताफ्यातील तब्बल १,१५० बस निवडणूक कामासाठी आरक्षित केल्या आहेत. मात्र यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येणार याची चिन्ह दिसत आहेत तर, त्याचसोबत दोन दिवस  प्रवाशांचे हाल होण्याचीही शक्यता वाटत आहे.


निवडणूक कामासाठी बसचे नियोजन : पुण्यात १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान पार पडणार आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे १४ जानेवारी रोजी निवडणूक कर्मचारी आणि मतदानाचे साहित्य केंद्रांवर पोहोचवण्यासाठी या बसचा वापर केला जाईल. तसेच मतदानाच्या दिवशी १५ जानेवारीला सकाळपासून मतदान प्रक्रिया संपेपर्यंत या बस निवडणूक ड्युटीवर तैनात असतील.


प्रवाशांना बसणारा फटका : शहरात दररोज सरासरी १,७५० बस रस्त्यावर धावत असतात. मात्र, निवडणूक कामासाठी १,१५० बस वळवण्यात आल्याने प्रवाशांच्या सेवेसाठी केवळ ६०० बस शिल्लक राहणार आहेत. बसच्या संख्येत निम्म्याहून अधिक घट झाल्यामुळे बस थांब्यांवर मोठी गर्दी आणि बसच्या फेऱ्यांमध्ये विलंब होण्याची दाट शक्यता आहे.


पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी सांगितले की, "दोन्ही महापालिकांच्या मागणीनुसार बस उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मात्र, प्रवासी सेवेवर कमीत कमी परिणाम व्हावा, यासाठी जास्तीत जास्त बस उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न असेल."


प्रवाशांनी या दोन दिवसांतील प्रवासाचे नियोजन आधीच करावे आणि शक्य असल्यास पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा विचार करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.


Comments
Add Comment

Malegaon Namaz Pathan : मालेगाव मनपा कार्यालयात नमाज पठण, सात जणांवर गुन्हा दाखल

मालेगाव महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये नमाज पडल्याप्रकरणी सात जणांवरती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर

Air Ticket Refund Rules: विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; आतापासून तिकिट रद्द केल्यास परतावा..., जाणून घ्या नवीन नियम

मुंबई: देशातील विमान प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान

12th Exam Paper Leak : बारावी पेपरफुटी प्रकरणाला अंत नाहीच! रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रानंतर गणिताचा पेपरसुद्धा फुटला ?

नागपूर : बारावी पेपरफुटी प्रकणात नवनवीन धक्कादायक खुलासे सुरुच आहेत. १८ फेब्रुवारी रोजी पेपर फुटीचा पोलीस

बल्लारपूर येथे टिंबर म्युझियम व झायलरियम उभारणार; सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीला वनमंत्र्यांचे ठाम आश्वासन

मुंबई: राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी

Parth Pawar: पार्थ पवारांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी घोषणा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय