दांडी गावात मुले पळवण्याच्या संशयावरून खळबळ

संशयित व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात


बोईसर : पालघर तालुक्यातील दांडी गावात मुले पळवणारी टोळी आल्याच्या संशयावरून ग्रामस्थ प्रचंड संतप्त झाले होते. मात्र, पालघर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत संशयितांना ताब्यात घेतल्याने एक मोठा अनर्थ रोखण्यात पोलिसांना यश आले. शुक्रवारी सकाळी दांडी गावात एका रिक्षामधून दोन पुरुष आणि एक महिला ब्लँकेट विकण्यासाठी आले होते.


ग्रामपंचायत कार्यालयाजवळ उभे असताना, हे अनोळखी लोक आपल्या मोबाईलमधून शाळकरी मुलींचे गुपचूप फोटो काढत असल्याचा संशय काही मुलींना आला. मुलींनी ही माहिती तातडीने आपल्या पालकांना दिली. गावकऱ्यांनी या संशयित व्यक्तींच्या मोबाईलची तपासणी केली असता, त्यामध्ये लहान मुलींचे फोटो आढळले. यामुळे गावात एकच खळबळ उडाली आणि 'मुले पळवणारी टोळी' आल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली. पाहता पाहता ग्रामस्थांचा मोठा जमाव तिथे गोळा झाला. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच जागरूक नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून अतिरिक्त पोलीस अधीक्षक विनायक नरळे, विभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, सातपाटीचे पोलीस निरीक्षक उदय सुर्वे आणि तारापूरचे पोलीस निरीक्षक निवास कणसे आपल्या पथकासह तातडीने दांडी गावात दाखल झाले. पोलिसांनी संतप्त जमावाची समजूत काढली आणि त्या तीन संशयित व्यक्तींना आपल्या ताब्यात घेतले.


अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन


पोलिसांनी वेळीच घटनास्थळी पोहोचून कारवाई केल्यामुळे जमावाचा रोष शांत झाला. सध्या पोलीस या तिघांची कसून चौकशी करत आहेत. "कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि संशयास्पद व्यक्ती आढळल्यास स्वतः कायदा हातात न घेता पोलिसांना कळवा," असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Palghar Blast Tarapur : तारापूर MIDC मध्ये भयंकर दुर्घटना! 'विराज प्रोफाइल'मध्ये एकापाठोपाठ ३ भीषण स्फोट; ३ कामगार जखमी

पालघर : तारापूर एमआयडीसीतील औद्योगिक क्षेत्रात आज (सोमवारी) सकाळी एकापाठोपाठ तीन महाभयंकर स्फोटांनी थरकाप

Chandigaon Tiranga Case : चंडीगाव ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणा, राष्ट्रध्वजाचा अवमान

डहाणू : स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाच्या सन्मानाबाबत डहाणू तालुक्यातील चंडीगाव ग्रामपंचायतीच्या कारभारातील

Mumbai News : धक्कादायक! वाढदिवसाच्या केकमध्ये आढळली पाल, 11 जणांना विषबाधा; 4 जण ICUमध्ये

नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील लक्ष्मी नगर परिसरातील निळकंठ अपार्टमेंटमध्ये वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान

Palghar Gang Rape : धक्कादायक! पालघरमध्ये तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार; तीन आरोपी अटकेत, तिघांचा शोध सुरू

Palghar Gang Rape : पालघर : पालघर जिल्ह्यातील तलासरी परिसरात 19 वर्षीय तरुणीवर सहा जणांनी सामूहिक लैंगिक अत्याचार (Gang Rape)

Jawharla Earthquake : पालघर जिल्हा हादरला! जव्हारला भूकंपाचे सलग धक्के! ४ वेळा हादरली जमीन

- नागरिकांनी भीतीच्या सावटाखाली जागून काढली रात्र पालघर : पालघर जिल्ह्यातील जव्हार परिसराला सोमवारी रात्री

Vasai Accident : आईच्या हातातून निसटलं अन् दुचाकीवरून पडून एक वर्षाच्या बाळाचा मृत्यू, वसईतील दुर्घटना

पालघर : वसईतील नायगाव (Vasai Accident) परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत दुचाकीवरून पडल्याने एक वर्षाच्या बाळाचा मृत्यू