बडोदरा : भारतीय कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने २०२६ च्या टी-२० विश्वचषक संघातून वगळल्याबद्दल अखेर आपले मौन सोडले आहे. या निर्णयावर त्याने एक तात्त्विक भूमिका घेतली असून, निवड समितीच्या निर्णयाचा आदर करत असल्याचे म्हटले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या पूर्वसंध्येला वडोदरा येथे पत्रकारांशी बोलताना गिल म्हणाला, "मी जिथे असायला हवं, बरोबर तिथेच आहे."
भारताचा वनडे कर्णधार शुभमन गिल एकेकाळी टी-२० संघाचा उपकर्णधार होता. सूर्यकुमार यादवनंतर आता गिल टी-२० संघासह तीनही फॉरमॅटचा कर्णधार होणार अशी चर्चा सुरू होती. मात्र भारतात अवघ्या काही महिन्यात सुरू होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपचा भारतीय संघ जाहीर झाला आणि शुभमन गिलसह सर्वांनाच धक्का बसला. १५ सदस्यांच्या संघात उपकर्णधार शुभमन गिललाच डच्चू देण्यात आला होता. उपकर्णधारपदावरून गिलला थेट संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यामुळे निवडसमिती अध्यक्ष अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांच्या टीम सिलेक्शनवर अनेक प्रश्नचिन्ह देखील उपस्थित झाले. संघ जाहीर झाला त्यावेळी गिल काही बोलला नव्हता. मात्र आता वन-डे मालिकेपूर्वी कर्णधार म्हणून प्रेस पत्रकारांशी बोलताना त्याला याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्याने टी-२० संघातून वगळ्याबद्दल त्याची काय भावना आहे याबाबत वक्त झाला. शुभमन गिलने निवडसमिती बाबत देखील आपले मत मांडले. त्यानं कोणतेही वादग्रस्त वक्तव्य न करत निवडसमितीचा निर्णय मान्य केला. तो म्हणाला, मी निवडसमितीच्या निर्णयाचा पूर्णपणे आदर करतो. मी टी-२० संघाला शुभेच्छा देतो. मला आशा आहे के वर्ल्डकप जिंकतील.' त्याचप्रमाणे गिलचे लक्ष आता फक्त संघावर आहे.