मकरसंक्रांत साजरी करू नका, नाही तर परिणाम भोगा!

बांगलादेशात हिंदूंना धमकी, जमात-ए-इस्लामीचा इशारा


ढाका : बांगलादेश निवडणुकांच्या दिशेने वाटचाल करत असताना देशात धार्मिक अल्पसंख्याकांवरील, विशेषतः हिंदू समाजावरील हिंसाचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर कट्टरपंथी संघटना जमात-ए-इस्लामीने मकर संक्रांती (स्थानिक भाषेत ‘शकरैन’) साजरी न करण्याचा इशारा दिला आहे.


जमात-ए-इस्लामीने सोशल मीडियावर आणि स्थानिक घोषणांद्वारे हिंदूंना धमकी देत, शकरैनच्या काळात संगीत वाजवणे, पतंग उडवणे किंवा कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केल्यास “कठोर परिणाम भोगावे लागतील,” असे स्पष्ट केले आहे. या इशाऱ्यामुळे ढाका, चितगाव, सिल्हेटसह अनेक हिंदूबहुल भागांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक कुटुंबांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव हा सण घरातच किंवा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरवर्षी १४ जानेवारी रोजी शकरैन मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मात्र अलीकडच्या काळात काही कट्टर गटांनी या सणाला “गैर-इस्लामी” ठरवत विरोध सुरू केला आहे. गेल्या वर्षी ढाका व चितगावमध्ये उत्सव साजरा करणाऱ्यांवर हल्ल्यांच्या घटना घडल्या होत्या.


डिसेंबर २०२५ मध्ये विद्यार्थी नेता उस्मान हादी यांच्या हत्येनंतर परिस्थिती अधिकच चिघळली. त्यानंतर हिंदूंवर हल्ले, हत्या आणि लिंचिंगच्या घटना वाढल्या. बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन युनिटी कौन्सिलनुसार, केवळ डिसेंबरमध्येच जातीय हिंसाचाराच्या किमान ५१ घटना नोंदल्या गेल्या आहेत. यामध्ये खून, जाळपोळ, दरोडे, खोट्या ईशनिंदेच्या आरोपांखाली अटक यांचा समावेश आहे. या वाढत्या हिंसाचारामुळे मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Comments
Add Comment

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बैठक

संयुक्त राष्ट्रे : रशियाने यूक्रेनवर केलेल्या नव्या हल्ल्यांनंतर दोन्ही देशांमधील संघर्षाबाबत संयुक्त

पाकिस्तानमध्ये महागाईचा भडका कायम; २३ आठवडे सलग दरवाढ, चिकन-भात सामान्यांच्या आवाक्याबाहेर

कराची : पाकिस्तानमधील आर्थिक परिस्थिती अजूनही सुधारण्याची कोणतीही ठोस चिन्हे दिसत नाहीत. आंतरराष्ट्रीय

'जैश - ए - मोहम्मद'चा म्होरक्या महसूर अजहरचा ऑडिओ व्हायरल; सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली

इस्लामाबाद : भारतविरोधी आक्रमक कारवायांसाठी ओळखल्या जाणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या हालचाली

व्हेनेझुएलाच्या तेलावर अमेरिकेचा ताबा

वॉशिंग्टन : जागतिक इंधन बाजारात मोठी उलथापालथ होत असून, अमेरिकेने व्हेनेझुएलावर प्रत्यक्ष ताबा मिळवल्यानंतर

Bangladesh News : बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या, तरुणाला बेदम मारहाण आणि विषबाधा; अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

ढाका : बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेच्या काळात हिंदू समुदायाला लक्ष्य करण्याचे सत्र अद्यापही सुरूच असल्याचे

पैसे घ्या आणि ग्रीनलँड द्या, ट्रम्पनी दिली मोठी ऑफर

वॉशिंग्टन डीसी : कायम हिमाच्छादित असलेल्या ग्रीनलँड द्वीप समुहाला कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेचा भाग