मार्लेश्वर मंदिराजवळ नदीपात्रात सुरुंग स्फोट

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील श्रीक्षेत्र मार्लेश्वर मंदिराजवळ नदीपात्रात सुरुंग स्फोट केले जात आहेत. मात्र, हे स्फोट अवैधरीत्या करण्यात येत असल्याचा आरोप मारळ येथील ग्रामस्थांनी केला असून, या स्फोटांना विरोध दर्शवला आहे. ठेकेदार व त्यांना सुरुंग स्फोटाची परवानगी देणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी व सुरुंग स्फोटाची साधने जप्त करण्यात यावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत मारळ ग्रामस्थांनी देवरुख तहसीलदार व देवरुख पोलिसांना निवेदन दिले आहे. या निवेदनात हा परिसर इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये येतो. मार्लेश्वर देवस्थान येथे श्री दत्त मंदिराकडे जाण्यासाठी पुलाचे काम सुरू आहे. हे काम करताना ठेकेदाराकडून नदीपात्रामध्ये सुरुंग लावले जात आहेत. आजपर्यंत ५० ते ६० सुरुंगाचे स्फोट करण्यात आले. मंदिराच्या पायथ्याशी होत असलेल्या सुरुंग स्फोटामुळे मंदिर परिसरातील अंगण व बांधकामांना तडे जात आहेत, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
Comments
Add Comment

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बैठक

संयुक्त राष्ट्रे : रशियाने यूक्रेनवर केलेल्या नव्या हल्ल्यांनंतर दोन्ही देशांमधील संघर्षाबाबत संयुक्त

Devendra Fadnavis: “दोन भाऊ येऊन गेले, पण त्यांना श्रीरामाची आठवणही झाली नाही”

नाशिक : निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाशिकच्या सभेतून उद्धव आणि राज यांच्यावर

Pune News :पुण्यातील रस्ते केले साफ,पुण्यात लवकरच आंतरराष्ट्रीय स्पर्धा.. नक्की काय होणार ?

पुणे: पुणे शहर आणि जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था हा नेहमीच नागरिकांसाठी कळीचा मुद्दा राहिला आहे.पण पुण्यातील

इंडियन आयडॉलमधून चमकलेला आवाज शांत; गायक प्रशांत तमांग यांचे वयाच्या ४३व्या वर्षी निधन

मुंबई : मनोरंजन विश्वासाठी धक्कादायक बातमी समोर आली असून, ‘इंडियन आयडॉल’च्या तिसऱ्या पर्वातून देशभर लोकप्रिय

स्वामी विवेकानंद यांची जयंती ; १० मुद्दे जे तुमचे भाषण गाजवतील

आज आपण 'युगपुरुष' स्वामी विवेकानंद यांची १६३ वी जयंती साजरी करणार आहोत. हा दिवस संपूर्ण भारतात 'राष्ट्रीय युवा

अशोक शिंदे बनले मनोवैज्ञानिक

अशा तीनही माध्यमांमध्ये अभिनेता अशोक शिंदे यांनी विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता