'ठाकरेंचा बालेकिल्ला ? याच भागातून आमचे उमेदवार तीन वेळा मोठ्या मताधिक्याने विजयी'



मुंबई : वरळी विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. भाजपचे आक्रमक नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी वरळीत प्रचारसभेत बोलताना आदित्य ठाकरे आणि उबाठा गटावर तिखट शब्दांत टीका केली. "हा ठाकरेंचा बालेकिल्ला आहे असे म्हणण्याची आता गरज उरलेली नाही, कारण आम्हीही तीन-तीन वेळा मोठ्या मताधिक्याने निवडून येतो," असे म्हणत त्यांनी सुरुवातीलाच आव्हान दिले.

बीडीडी चाळ आणि विकासाचा मुद्दा


वरळीतील कळीचा मुद्दा असलेल्या बीडीडी चाळीच्या पुनर्विकासावरून राणेंनी आदित्य ठाकरेंना घेरले. "वडील मुख्यमंत्री होते आणि मुलगा मंत्री, तरीही बीडीडी चाळीत राहणाऱ्या मराठी माणसाला न्याय मिळाला नाही. हा प्रश्न सोडवण्यात ते सपशेल अपयशी ठरले आहेत," असा आरोप त्यांनी केला. तसेच, बीडीडी चाळीच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

हिंदुत्व आणि 'हिरवे साप'


बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाचा संदर्भ देत नितेश राणे म्हणाले की, "बाळासाहेबांनी कधीच हिंदुत्वाशी तडजोड केली नाही, म्हणूनच मुंबईतील मराठी माणूस दंगलीत वाचला. मात्र, आज त्यांच्या पक्षात बॉम्बस्फोटाच्या आरोपींना आणि 'हिरव्या सापांना' प्रवेश दिला जात आहे. जर आज बाळासाहेब असते, तर त्यांनी अशा लोकांना ढुंगणावर लाथ मारून बाहेर काढले असते."

अमित आणि आदित्य यांच्यावर टीका


अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यातील वाढत्या जवळीकीवर भाष्य करताना राणे म्हणाले की, "आम्ही एकत्र आलो नाही तर हे दोन्ही भाऊ बेरोजगार होतील, या भीतीनेच ते एकत्र आले आहेत." तसेच, मुंबईतील मराठी माणसाचा टक्का घसरण्याला सध्याची सत्ताधारी यंत्रणा जबाबदार असल्याचे त्यांनी नमूद केले.

अस्तित्वाची लढाई आणि थेट आव्हान


"ही निवडणूक केवळ मतांची नसून आपल्या अस्तित्वाची आहे. जर यांची सत्ता आली तर मुंबईतील मंदिरे सुरक्षित राहणार नाहीत," अशी भीती त्यांनी व्यक्त केली. भाषणाच्या शेवटी त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचे आवाहन केले. "आमचा उमेदवार निवडून आला तर विजयाचे फटाके वाजवायला मी स्वतः येणार आणि एक फटाक्याची माळ 'मातोश्री' (कलानगर) समोरही लावणार," असे थेट आव्हान त्यांनी दिले.

Comments
Add Comment

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' निवासस्थानी बाप्पाला निरोप!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी लाडक्या बाप्पाला पर्यावरणपूरक पद्धतीने निरोप

एकनाथ शिंदेंमधील संवेदनशील नेत्याचा पुन्हा प्रत्यय; ड्युटीवरील पोलीस कोसळताच प्रोटोकॉल बाजूला सारून धावले!

अनंत चतुर्दशीच्या गडबडीत व्हीआयपी बंदोबस्ताचा ताण आणि सकाळपासूनचे कर्तव्य यामुळे ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस

यशस्वी जयस्वाल श्रीलंकन खेळाडूला का नडला? ध्रुव जुरेलने बाहेर काढला जुना किस्सा

भारतीय संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. या मालिकेतील पहिल्या सामन्यात

Asian Games 2026 : भारतीय महिला हॉकी संघाचा दिमाखदार पराक्रम; जपानचा 3-1 ने धुव्वा उडवत गाठली उपांत्य फेरी!

गिफू : आशियाई खेळ 2026 मधील भारतीय महिला हॉकी संघाने उत्कृष्ट आणि आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत नवा इतिहास रचला आहे.

भारताला स्थायी सदस्यत्व मिळणार? पोर्तुगालने UNSC मध्ये सुचवले महत्त्वाचे बदल

नवी दिल्ली: संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये भारताच्या सदस्यत्वाला पोर्तुगालकडून विशेष समर्थन मिळाले आहे.

Dyson V16 Piston Animal : घराची सफाई आता हायटेक! 'डायसन V16 पिस्टन ॲनिमल' भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत-फीचर्स

मुंबई : डायसनने भारतात V16 Piston Animal cordless vacuum cleaner लॉन्च केला आहे. या नव्या व्हॅक्यूममध्ये कंपनीने All Floor Cones Sense cleaner head, 900W Hyperdymium मोटर,