तेजस नेटवर्कचा तिमाही निकाल जाहीर कंपनीच्या महसूलात घसरण

मोहित सोमण: तेजस नेटवर्क (Tejas Networks Limited) कंपनीचा तिमाही निकाल जाहीर झाला आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या निव्वळ महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) २६४२ कोटीवरून ३०७ कोटींवर घसरले आहे तर कंपनीच्या करपूर्व नफ्यात (Profit before tax PBT) गेल्या वर्षाच्या तिमाहीतील २११ कोटीवरून यावर्षीच्या तिमाहीत (Q3FY26) ३०३ कोटीवर वाढ झाली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit after tax PAT) इयर ऑन इयर बेसिसवर तिसऱ्या तिमाहीत १६६ वरून १९७ कोटींवर वाढ झाली आहे.


कंपनीने भारतनेटसाठी अतिरिक्त पॅकेजेस जिंकली असल्याचेही फायलिंगमध्ये म्हटले आहे. भारतनेट फेज ३ साठी IP/MPLS राउटर्सचे एक अग्रगण्य पुरवठादार आहोत असेही कंपनीने यावेळी म्हटले. आतापर्यंत जाहीर झालेल्या १२ पैकी ७ पॅकेजेस जिंकली आहेत. माहितीनुसार, कवच पायलट प्रकल्पासाठी दिल्ली-मुंबई रेल्वे कॉरिडॉरच्या एका भागासाठी 5G RAN पुरवठादार म्हणून निवड झाली असल्याचेही कंपनीने म्हटले.


यासह कंपनीने खाजगी टेलिकॉम कंपन्यांकडून DWDM आणि GPON OLT उपकरणांसाठी विस्ताराच्या ऑर्डर मिळाल्या असल्याचेही नव्या अपडेटमध्ये सांगितले आहे. कंपनीने आफ्रिकेतील एका ब्रॉडबँड ISP कडून DWDM बॅकबोन बिल्डआउटची ऑर्डर आणि दक्षिण-पूर्व आशियातील एका ऊर्जा क्षेत्रातील कंपनीसाठी आमच्या MPLS-TP उत्पादनांसाठी नेटवर्क ट्रान्सफॉर्मेशन ॲप्लिकेशनची ऑर्डर मिळाली असल्याचे म्हटले आहे.


तेजस नेटवर्क्सचे मुख्य परिचालन अधिकारी (COO) अर्नोब रॉय म्हणाले आहेत की,' तिसऱ्या तिमाही (FY26 )मध्ये, आमचा महसूल प्रामुख्याने भारतातील खाजगी आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांना वायरलाइन उत्पादनांच्या विक्रीमुळे वाढला. या तिमाहीत आम्ही भारत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आमच्या वायरलेस उत्पादनांसाठी अनेक फील्ड चाचण्या केल्या.व्यावसायिक वाटाघाटी पुढील काही महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.


यासह कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) सुमित धिंग्रा म्हणाले आहेत की,' तिसऱ्या तिमाही (FY26) मध्ये आमचा महसूल ३०७ कोटी रुपये होता, जी तिमाही दर तिमाही (Q0Q) १७% वाढ आहे. आम्ही तिमाहीच्या अखेरीस १३२९ कोटी रुपयांच्या ऑर्डर बुकसह तिमाहीचा शेवट केला. आमचे निव्वळ कर्ज Q2FY26 मधील ३७३८ कोटी रुपयांच्या तुलनेत ३३४९ कोटी रुपये होते, जे प्रामुख्याने कमी खेळत्या भांडवलामुळे होते, ज्याची काही प्रमाणात भांडवली खर्चामुळे भरपाई झाली. एकूण कर्ज ३८८५ कोटी रुपये आणि रोख रक्कम ५३७ कोटी रुपये होती.' असे निकालादरम्यान म्हटले आहे.


तेजस नेटवर्क्स लिमिटेड ही बंगळूर, भारत येथे मुख्यालय असलेली एक जागतिक वायरलाइन आणि वायरलेस नेटवर्किंग उत्पादने कंपनी आहे. कंपनी टाटा समुहाची उपकंपनी (Subsidiary) आहे. तेजस उच्च कार्यक्षमता असलेली उत्पादने डिझाइन आणि उत्पादित करते. ज्यामध्ये 4G/5G रेडिओ ॲक्सेस (LTE/NR), ऑप्टिकल ट्रान्समिशन (DWDM/OTN), फायबर ब्रॉडबँड (GPON/XGS-PON), आणि कॅरियर-ग्रेड स्विचेस व वायफाय राउटर्स या उत्पादनाचा समावेश आहे. काल गुंतवणूकदारांनी तिमाही निकालांच्या पूर्व परिस्थितीत नकारात्मक कौल दिल्याने शेअर ५.२२% कोसळत ४१८.६५ रूपये प्रति शेअरवर बंद झाला होता.गेल्या पाच दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये ८.२२%, १ महिन्यात ९.३०%, तर वर्षभरात ६०.५७% घसरण झाली असून मात्र इयर टू डेट बेसिसवर (YTD) शेअर्समध्ये ७.२८% घसरण झाली होती.

Comments
Add Comment

आयोगाच्या नियमामुळे गोंधळात गोंधळ,

प्रचार बंदी नंतरही उमेदवाराला गाजावाजा न करता प्रचार करता येणार? मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या

प्रचाराच्या तोफा थंडावल्या

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मागील काही दिवसांपासून धडाधडाणाऱ्या

मतदानाला जाताना ओळखीच्या पुराव्यांपैंकी एक पुरावा बाळगा जवळ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी पात्र मतदारांना मतदान केंद्रावर

मकरसंक्रांतीच्या दिवशी का खातात खिचडी ?

मुंबई : यंदा मकरसंक्रांत बुधवार १४ जानेवारी २०२६ रोजी आहे. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. या

मुंबईतील ८५ लाख मतदारांना झाले मतदार ओळखपत्रांचे वाटप

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ च्या अनुषंगाने गुरुवार, १५ जानेवारी

मुंबईत मतदान केंद्रासह परिसरही राखणार स्वच्छ

पुढील तीन दिवसांमध्ये राखली जाणार स्वच्छता मोहिम मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र