मनसे नेते मनीष धुरींकडून नाराजी व्यक्त....


मनसे नेते मनीष धुरी गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत. आणि त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. मनीष धुरी यांची नाराजी ही कायमची आहे. 'मी नाराज शंभर टक्के आहे. आम्हाला देखील दुसरी खेळी खेळत येते . जर ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमावरपर्यंत युती धर्माचे पालन नाही केले, तर मोठं निर्णय घेणार.


माझी नाराजी उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांच्यावर नाही, तर माझी नाराजी ठाकरे शिवसेनेच्या अंधेरी पश्चिम विधानसभेच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर आहे. असं मनीष धुरी यांनी सांगितलं. त्याच कारण म्हणजे आम्ही जो प्रभाग मागितला होता, त्या प्रभागात आम्हाला उमेदवारी न देता, त्यांचे विभाग प्रमुख अनिल परब यांनी राज साहेबांचा शब्द देऊन आम्हला विभाग क्रमांक ६६ दिलेला आहे.


ज्या दिवसापासून उमेदवारी जाहीर झाली आहे, त्या दिवसापासून एक ही त्यांचा पदाधिकारी प्रचारात सहभागी होत नाहीये आणि आताही तीच परिस्थिती आहे. आमचे पदाधिकारी जिथे जिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार उभे आहेत. तिथे, तिथे युती धर्माचं पालन करत आहेत .


Comments
Add Comment

डॉलरचे स्वामित्व उखाडून फेकण्यासाठी भारताचा पुढाकार चार वर्षांत भारताच्या युएस ट्रेझरीत ४ वर्षांत पहिल्यांदा घसरण

मोहित सोमण: आरबीआयच्या धोरणात्मक निर्णयाचा बदल झाल्यामुळे युएसमधील मक्तेदारीला आव्हान देण्याचे काम सातत्याने

जागतिक अस्थिरता शेअर बाजारात परावर्तित सेन्सेक्स ४१४ व निफ्टी १२० अंकाने कोसळला

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात घसरण झाली आहे. जागतिक अस्थिरतेचा फटका आजही कायम

महापालिकेत स्वतंत्र सांस्कृतिक विभाग, पर्यटन विभागाची स्थापना

महायुतीने दिला मुंबईतील मतदारांना शब्द मुंबई : मुंबईची संस्कृती, कला व वारसा जतन व प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई

इराणच्या स्वातंत्र्यासाठी लढण्यास अमेरिका तयार : ट्रम्प

वॉशिंग्टन : इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुन्हा ‘कोर्टा’च्या कचाट्यात

सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीकडे लक्ष मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या

हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठीच ठाकरे बंधू एकत्र

मंत्री नितेश राणे यांनी घेतला ठाकरे बंधूंचा समाचार ठाकरे पुत्रांपेक्षा उत्तर भारतीय चांगली मराठी भाषा