Vodafone Idea Update: सरकारने कंपनीचा एजीआर गोठवल्यानंतर वीआय शेअर्समध्ये ८% वाढ

मोहित सोमण: वोडाफोन आयडियासाठी मोठा दिलासा टेलिकॉम विभागाने (Department of Telecommunication DoT) दिला आहे. नव्या अपडेटनुसार विभागाने कंपनीची थकीत देय रक्कम असलेल्या एजीआरला त्वरीत चुकती न करवून घेता गोठवली (Freeze) केली आहे. त्यामुळे लगेचच कंपनीला ती रक्कम न देता टप्याटप्याने ही रक्कम विभागाला भरावी लागणार आहे. कंपनीने याविषयी एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला आता केवळ मार्च २०२६ ते मार्च २०३१ दरम्यान ११४ कोटी रुपये भरावे लागतील तर ते पूर्ण भरल्यावर मार्च २०३२ ते मार्च २०३५ कालावधीत उर्वरित १०० कोटी ४ वर्षात द्यावे लागतील असे कंपनीने म्हटले. त्यानंतर जी उर्वरित थकीत एजीआर (Average Gross Revenue AGR) मार्च २०३६ ते मार्च २०४१ कालावधीत भरावे लागतील असेही पुढे कंपनीने म्हटले आहे.


त्यामुळे ही रक्कम भरण्यासाठी टेलिकॉम विभागाने (DoT) समिती नेमली असून तिचा निर्णय याबाबत अंतिम राहील असे ठरलेले असल्याचेही कंपनीने यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे ही रक्कम ठरलेल्या मुदतीत सूचित केलेल्या हप्त्यात वेळेवर भरणे कंपनीवर बंधनकारक असणार आहे. यासह आर्थिक वर्ष २०१८ ते २०१९ कालावधीतील थकबाकी एजीआर ही २०२६ ते २०३१ कालावधीत टप्प्यात दिली जाणार आहे. हा वाद सरकार व कंपनी (VI) यांच्यात कायम असताना २७ ऑक्टोबर २०२५ रोजी व्हीआयने सरकार विरोधी याचिकेत दिलासा मिळवला होता कारण त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने हे थकित देयीसाठी सरकारने काही मार्ग काढावा असे सूचित केले होते. त्यानंतर सरकारने हे पाऊल उचलल्याने व्हीआयला मोठा दिलासा मिळाला आहे.


एकीकडे आर्थिक चणचणीत असताना कंपनी वाचवण्यासाठी सरकारने ४९% भागभांडवल कंपनीत खरेदी केले होते. दरम्यान कंपनीचे कामकाज वोडाफोन पीएलसी आणि आदित्य बिर्ला समुह यांच्या हातात पूर्ववतच राहिल असे सरकारने यावेळी म्हटले होते.१ जानेवारीला कंपनीला ६३८ कोटींची जीएसटी नोटीस मिळाल्यानंतर कंपनीला आणखी एका अडचणीला सामोरे जावे लागत होते. तत्पूर्वी कंपनीच्या कामकाजाला बळ मिळण्यासाठी प्रवर्तकांनी (Promoters) पुढील १२ महिन्यात २३०७ कोटींची गुंतवणूक खेळत्या भांडवलासाठी (Working Capital Requirments) करणार असल्याचे स्पष्ट केले होते. २०२० मध्ये सरकारने प्रलंबित निधी भरण्याचे आदेश देताना कंपनीची याचिका फेटाळली असली तरी पुढील १० वर्षात थकबाकी भरण्याची मूभा दिली होती. ३१ डिसेंबरला न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारने हे तात्पुरते प्रमुख थकीत एजीआर २०३१ गोठवण्याचे ठरवले होते. त्यानंतर हा महत्वाचा निर्णय पुढे आला आहे.


आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत कंपनीचे एकूण देणी (Debt) २.०२ लाख कोटीहून अधिक आहे. वोडाफोन आयडिया यांच्या विलीनीकरणानंतर ८७००० कोटीचे एजीआर प्रलंबित होते. एजीआर हे सरकारला टेलिकॉम कंपन्यानी आपल्या सरासरी महसूलातील आधारे लायसन्स, व स्पेक्ट्रमसाठी आवश्यक असणारी फी भरणे असते. कंपनीच्या आजच्या नव्या माहितीनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये आज ८% तुफान इंट्राडे वाढ झाली होती. दुपारी १२ वाजेपर्यंत मात्र कंपनीच्या शेअर्समध्ये ०.२६% किरकोळ घसरण झाली आहे. शेअरने आज ११.५२ रूपये प्रति शेअर हा उच्चांक नोंदवला आहे. कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल (Market Capitalisation) १.२४ लाख कोटी रुपये आहे. गेल्या ५ दिवसात कंपनीच्या शेअर्समध्ये २.६३% घसरण झाली असून महिन्यात शेअर्समध्ये ६.८०% वाढ झाली आहे. संपूर्ण वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये ४४.८२% वाढ झाली असून इयर टू डेट बेसिसवर (YTD) शेअर्समध्ये ३.१३% घसरण झाली आहे.

Comments
Add Comment

IND vs ENG 1st ODI : अक्षर-वॉशिंग्टनची कमाल! इंग्लंडवर भारताचा दणदणीत विजय; पण शुभमन गिलमुळे वाढलं टेन्शन

बर्मिंगहॅम : भारताने इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेची विजयी सुरुवात करत पहिल्या सामन्यात ६

Rental Boyfriend Trend : भारतात 'Rent Boyfriend' ट्रेंडची एंट्री! तासाच्या हिशोबाने मिळतो बॉयफ्रेंड, काय आहे हा प्रकार?

मुंबई : ऑनलाईन (Online) कॅब बुक (Cab Book) करणे किंवा पर्सनल ट्रेनर (Personal Trainer) शोधणे आता सर्वसामान्य झाले आहे. मात्र, आता भारतात 'Rent

FIFA World Cup 2026 : स्पेनचा दणका, फ्रान्सचा धक्का! एका चुकीने एम्बाप्पेचे Final चे तिकीट हुकले

FIFA World Cup 2026 : FIFA World Cup 2026 च्या पहिल्या सेमी फायनल (Semi Final) सामन्यात युरोपियन चॅम्पियन स्पेनने (Spain) फ्रान्सचा (France) २-० असा पराभव

FIFA World Cup 2026 : स्पेनचा दबदबा कायम! एम्बाप्पेला रोखत फ्रान्सला दिला २-० चा धक्का

FIFA World Cup 2026 : FIFA World Cup 2026 च्या उपांत्य फेरीत (Semi Final) स्पेनने आपल्या प्रसिद्ध टिकी-टाका (Tiki-Taka) शैलीचा अप्रतिम नमुना सादर करत

Mumbai-Goa Express Highway : कशेडी घाटात दरड कोसळली; मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद, एकाच लेनवरून दुहेरी वाहतूक

पोलादपूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Goa National Highway) प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर

Maharashtra Weather Alert : राज्यात पुन्हा बदलणार हवामान; मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने (Rain) काहीशी उघडीप घेतली असली तरी आता पुन्हा पावसासाठी पोषक