देशातील सर्वात मोठ्या सोलार सेल प्रकल्पाची टाटा पॉवरकडून घोषणा तरीही शेअर कोसळला

मोहित सोमण: टाटा पॉवर कंपनीने (Tata Power Company) आज भारतातील सर्वात मोठ्या ४००/२२० केवी मेट्रो डेपो सब स्टेशन आंध्रप्रदेशात उभारण्याची घोषणा केली आहे. सोलार उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या सेल प्रकल्प या निमित्ताने उभारला जाणार असून हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा प्रकल्प असणार आहे. १००० एमवीए (MVA) मेगावॉट अतिरिक्त क्षमता असलेला हा प्रकल्प असून ग्रेटर नोएडा, दिल्ली एनसीआर (Delhi NCR) भागात वाढत असलेल्या अतिरिक्त मागणीमुळे वाढत्या उत्पादनासाठी कंपनीने हा निर्णय घेतल्याचे कंपनीने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. विशेषतः उत्तरेकडे असलेल्या राज्यांना अपुरा असलेला पुरवठा व वाढती मागणी यासाठी कंपनीने हा धोरणात्मक निर्णय घेतल्याचे कंपनीने यावेळी स्पष्ट केले आहे.


याविषयी अधिकृत घोषणा करताना,'ही आंतरराज्य (Interstate) ट्रान्समिशन (पारेषण) प्रणाली टाटा पॉवरची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या टीपी जलपुरा खुर्जा ट्रान्समिशन लिमिटेड (पूर्वी जलपुरा खुर्जा पॉवर ट्रान्समिशन लिमिटेड म्हणून ओळखली जाणारी) अंतर्गत कार्यान्वित करण्यात आली आहे आणि जलपुरा खुर्जा टीबीसीबी प्रकल्पातील हा पहिला महत्त्वाचा टप्पा आहे. या प्रकल्पाचे वेळेवर कार्यान्वयन हे अचूक अंमलबजावणी आणि शाश्वत पायाभूत सुविधांच्या विकासातील टाटा पॉवरच्या उत्कृष्टतेवर अधोरेखित करते. या नवीन समावेशामुळे, टाटा पॉवरच्या पारेषण पोर्टफोलिओमध्ये आता संपूर्ण भारतात कार्यान्वित आणि निर्माणाधीन असलेल्या ७०४७ सर्किट किलोमीटर लांबीच्या लाईन्सचा समावेश आहे, ज्यामुळे देशाचे वीज पारेषण नेटवर्क मजबूत करण्यामध्ये कंपनीची भूमिका अधिक दृढ होते.' असे म्हटले.


टाटा पॉवर सोलार लिमिटेड जी टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडची (द टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची उपकंपनी) सौर ऊर्जा उत्पादन करणारी शाखा आणि पूर्ण मालकीची उपकंपनी आहे त्या कंपनिने एप्रिल २०२५ ते डिसेंबर २०२५ (९ महिन्यांच्या कालावधीत) मजबूत उत्पादन कामगिरी नोंदवली होती. या कालावधीत, टीपी सोलरने २.८ GW डीसीआर सौर पेशी आणि २.९ GW सौर मॉड्यूल्सचे उत्पादन केले. २.९ GW मॉड्यूल्सपैकी, २.४ GW डीसीआर मॉड्यूल्स होते आणि उर्वरित ०.५ GW एएलएमएम मॉड्यूल्स होते. टीपी सोलर तामिळनाडूच्या तिरुनेलवेली येथे भारतातील सर्वात मोठ्या एकाच ठिकाणी असलेल्या अत्याधुनिक ४.३ GW सौर पेशी आणि मॉड्यूल उत्पादन सुविधेचे संचालन करते.तत्पूर्वी ७ जूनला कंपनीने ६६७५ कोटींच्या १० गिगावॉट प्रकल्पाची घोषणा केली होती जो भारतातील व आंध्रप्रदेशातील सर्वात मोठा सोलार वेफर (इनगोट) असेला ग्रीनफिल्ड प्रकल्प आहे.


सकाळच्या सत्रातील सुरुवातीला कंपनीच्या शेअर्समध्ये १ ते २% वाढ झाली असली तरी दुपारी ११ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये १.३०% घसरण झाल्याने शेअर ३६९.३५ रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे. आतापर्यंत सकाळपासून कंपनीच्या शेअरने ३७४ रुपये इंट्राडे उच्चांक नोंदवला. गेल्या ५ दिवसात कंपनीच्या शेअर्समध्ये ५.५४% घसरण झाली असून महिन्यात १.८३% घसरण झाली. तर संपूर्ण वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये ०.६०% वाढ झाली असून इयर टू डेट बेसिसवर (YTD) २.८४% घसरण झाली आहे.

Comments
Add Comment

'मुंबईत फक्त जय श्रीराम म्हणणारेच निवडून द्यायचे'

मुंबई : मनात जय श्रीराम म्हणा आणि मतदान करा. मुंबईचा रंग बदलू द्यायचा नसेल तर जय श्रीराम म्हणणारे नगरसेवक निवडून

मुंबईत परिवर्तन कोणी केलं ? विकासकामं कोणी केली ?

मुंबई : परिवर्तन कोणी केलं ? विकासकामं कोणी केली ? हे मुंबईकरांना व्यवस्थित माहिती आहे. मुंबईत मेट्रो आणि

पैसे घ्या आणि ग्रीनलँड द्या, ट्रम्पनी दिली मोठी ऑफर

वॉशिंग्टन डीसी : कायम हिमाच्छादित असलेल्या ग्रीनलँड द्वीप समुहाला कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेचा भाग

लालू प्रसाद यादव यांच्यासह कुटुंबातील चौघांवर भ्रष्टाचाराचे आरोप निश्चित

नवी दिल्ली : दिल्लीतील राउज ॲव्हेन्यू न्यायालयाने शुक्रवारी राष्ट्रीय जनता दल पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव,

मोठी बातमी! 'या' कारणासाठी पुण्यातील भीमाशंकर मंदिर राहणार ३ महिने बंद

पुणे : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे सुरू होणाऱ्या मोठ्या विकासकामांमुळे मंदिर भाविकांसाठी तात्पुरते बंद

निवडणुकीत नातवाचे तिकीट कापताच आजीने धरलं 'या' मंत्र्याला धारेवर

कोल्हापूर : राज्यात सर्वच्या सर्व २९ मनपांसाठी १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला मतमोजणी तसेच निकाल आहे. या