पुण्यात हत्याकांड; मित्र झाला वैरी, धारदार शस्त्र आणि दगडाने केली हत्या

पुणे : पुण्यात मित्रच निघाले पक्के वैरी... मित्रांनीच दुसऱ्या मित्राला मारहाण करत जीवानिशी मारल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. ही घटना आहे पुणे शहरातील विश्रामवाडी येथे घडली असून, काही दिवसांपूर्वी विश्रामवाडी येथील एक १७ वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची बातमी पुणे पोलिसांना मिळाली होती. पोलीस त्या मुलाचा शोध घेत असताना या मुलाची हत्या झाल्याचे पोलिसांना कळले. मृत मुलाचे नाव ( अमनसिंग सुरेंद्रसिंग गचंड ) आहे. मुलाची चाकूने गळा चिरून अमानुषपणे हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी ५ आरोपींना ताब्यात घेतले आहे. तब्बल ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



नेमकं काय घडलं?


खेड शिवापूर येथील वर्तमुख मंदिराच्या डोंगराळ परिसरात २९ डिसेंबरच्या दिवशी मैत्रिणीच्या सांगण्यावरून अमनसिंग ठिकाणी भेटायला गेला. दोघांनी मंदिरात दर्शन घेतले, तेवढ्यात धबाले नावाचा मित्र तिथे आला. तो अमनसिंगला डोंगरावर घेऊन गेला आणि इतर मित्रांनाही तिथे बोलावलं. नंतर आरोपींनी अमनसिंग सोबत पार्टी केली. अमनसिंगला भरपूर बिअर पाजण्यात आली. यानंतर गळयावर कोयत्याने वार करत अमनसिंगची हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर डोकं दगडाने ठेचून मृतदेह खड्ड्यात पुरण्यात आला.


अमनसिंग घरी न आल्याने त्याच्या आईने तक्रार केली. आईच्या तक्रारीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करत अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी पूर्वीच्या वादातून अमनसिंगचा खून केल्याची आणि मृतदेह पुरल्याची कबुली दिली.

Comments
Add Comment

Persimmon of My Love : पहिला रशियन सिनेमा ज्यात खच्चून भरलाय बॉलिवूडचा मसाला

नवी दिल्ली : बातमीचं हेडिंग वाचून चक्रावला असाल. पण हा एक अभिनव प्रयोग आहे. भारतात मुंबई, उदयपूर, जयपूर येथे या

कामगार कर्मचारी संघाची नवी मुंबई विमानतळ व्यवस्थापन समितीची कार्यकारिणी जाहीर

नवी मुंबई : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापन समितीच्या

Gayatri Datar : प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच अडकणार विवाह बंधनात, सोशल मीडियावर शेअर केला 'हा' सुंदर व्हिडीओ

मुंबई : कलाविश्वातील अनेक कलाकार सध्या विवाहबंधनात अडकले आहेत. अशातच आता आणखी एका अभिनेत्रीचा विवाह सोहळा लवकरच

Bigg Boss Marathi 6 : टिकीट टू फिनालेसाठी 'या' सदस्यांमध्ये हाणामारी, बिग बॉसही संतापले

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सिझन वादग्रस्त ठरल्यामुळे सर्वत्र या सिझनची जोरदार चर्चा रंगली. या बिग बॉस मराठीमधील

Arpit Bala : कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकावर थुंकला प्रसिध्द गायक, रागात बाटलीही फेकली, नेमकं काय घडलं?

मुंबई : आपल्या 'बरगद' या गाण्यामुळे २०२५ मध्ये रातोरात प्रसिद्ध झालेला गायक अर्पित बाला याची सध्या सर्वत्र जोरदार

Akshaye Khanna : 'रहमान डकैत' ते 'थेट शुक्राचार्य', अक्षय खन्नाच्या लूकची सोशल मीडियावर चर्चा

मुंबई : धुरंधर २ सिनेमानं जगभरात धूमाकूळ घातली आहे. धुरंधर २ सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून सर्वत्र रणवीर सिंह आणि