जन नायगन; थलापती विजयचा शेवटचा चित्रपट ९ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार नाही, कारण आले समोर...

हैद्राबाद : नुकताच विजय थलापथी याने अभिनय क्षेत्राला कायमचे रामराम ठोकून पूर्णपणे राजकारणात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. विजय हा तामिलगा वेत्री कगझम हा पक्षासोबत कायमचा राजकारणात उतरण्यापूर्वी 'जन नायगन' हा त्याचा शेतवह चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.



नेमकं घडलं काय ?


हाच चित्रपट रिलीज करण्यापूर्वी १८ डिसेंबर रोजी सीबीएफसीकडे सादर करण्यात आला. निर्मात्यांना चित्रपटात २७ कट करण्यासही सांगितले आणि त्या निर्देशांचे पालन करून त्यांनी आवश्यक ते बदलही केले. आणि चित्रपट पुन्हा सादर केला. परंतु सीबीएफसी ने चित्रपटाला पुन्हा पुनरावलोकनसाठी पाठवण्याची आवशक्यता असल्याचे सांगत प्रमाणपत्र दिले गेले नाही.



मद्रास उच्च न्यायालयाचे निर्णय


चित्रपटाच्या निर्मात्यांनी कोर्टात धाव घेतली असता, मद्रास उच्च न्यायालयाने सीबीएफसी ला जन नायगान या चित्रपटासाठी त्वरित  U / A प्रमाणपत्र देण्याचे निर्देश देण्यात आले. न्यायमूर्ती पी. टी. आशा म्हणाल्या, " साहित्य तपासल्यानंतर हे स्पष्ट होते की नंतर विचारत घेतलेली असलयाचे दिसून येते" न्यायालयाने पुढे म्हटले की, " अध्यक्षांनी दिलेल्या अधिकाराचा वापर करणे अधिकारक्षेत्राबाहेरचे आहे. तसेच पुनरावलोकन साठी पाठवलेला अधिकार रद्द करण्यात आला.



रिलीज तारीख पुढे ढकलण्यात आली


या सर्व दोन दिवसाच्या प्रचंड नाट्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याने आणि सीबीआय प्रमाणपत्र मिळण्यास विलंब झाल्याने निर्मात्यांना चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलावे लागले. ९ जानेवारीला प्रदर्शित होणार सिनेमा आता केव्हा रिलीज होणार याची स्पष्ट तारीख समोर आलेली नाही.

Comments
Add Comment

Sunny Deol : सनी देओलच्या ‘बटवारा १९४७’ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; विकेंडला केली जोरदार कमाई, २३ चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले!

सनी देओल (Sunny Deol) आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) यांचा ‘बंटवारा १९४७’ (Batwara 1947) हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी

Babita Singh Reporting Release Date : ‘पाताळ लोक’च्या निर्मात्यांची नवी पेशकश; एक हत्या, दोन रहस्यं आणि स्वतःचा शोध घेणारा एक प्रवास

- प्राइम व्हिडिओने रोमांचक इन्व्हेस्टिगेटिव्ह ड्रामा ‘बबिता सिंग रिपोर्टिंग’च्या वर्ल्डवाइड प्रीमियरची

Actress Ananya Raj : अभिनेत्री अनन्या राजचं वयाच्या २८व्या वर्षी निधन; झोपेत घेतला अखेरचा श्वास

मुंबई : मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेत्री अनन्या राजचं वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी निधन झालं

Upcoming Web Series : सचिन तेंडुलकरच्या जिवलग मित्राची कहाणी लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार; प्रमुख भूमिकेत कोण ?

मुंबई : क्रिकेट विश्वात काही खेळाडूंच्या वैयक्तिक जीवनाची चर्चा त्यांच्या खेळातील विक्रमांपेक्षाही अधिक झाली.

Ashwin Mushran : अभिनेता अश्विन मुश्रानच्या कारचा अपघात, स्थानिकांशी वाद घालतानाचा Viral Video

मडगाव : 'लगे रहो मुन्ना भाई', 'शहजादा', 'फॅशन', 'मैं तेरा हीरो' आणि 'देसी बॉईज' अशा निवडक हिंदी चित्रपटांतून चमकलेला

Govinda and Sunita Ahuja Controversy : सुनीता आहुजाच्या आरोपांवर गोविंदा संतापला; म्हणाला, लिमिटमध्ये राहा...!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वैयक्तिक वाद आता जगजाहीर होऊ लागले आहेत.