Dhurandhar Box Office Collection Day 35: धुरंदर चित्रपटाचा ३५ व्या दिवशी बॅाक्स ऑफिसवर धुमाकुळ...


धुरंदर: रणवीर सिंह आणि अक्षय खन्नाच्या या चित्रपटामुळे देशभर नव्हे तर जगभर कौतुक होत आहे...व या चित्रपटाने सर्व चाहत्यांच्या मनामध्ये आपली वेगळीच जागा बनवली आहे...आदित्य धर दिग्दर्शित स्पाय थ्रिलर चित्रपट‘धुरंधरबॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. चित्रपटाने आता सहाव्या आठवड्यात प्रवेश केला असला, तरी त्याच्या कमाईचा वेग अजूनही कायम आहे. रणवीर सिंहच्या या बहुचर्चित चित्रपटाने भारतात ९०० कोटींच्या दिशेने मजल मारली असून, जगभरात १२०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.


जिओ स्टुडिओजने सोशल मीडियावरधुरंधर’च्या ३५ दिवसांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची अधिकृत माहिती शेअर केली आहे. पोस्टमध्ये “घातक इन इम्पॅक्ट आणि ग्लोरियस इन स्केल, धुरंधर वर्ल्डवाइड सिनेमागृहांवर राज्य करत आहे” असे नमूद करण्यात आले आहे.जिओ स्टुडिओनुसार, चित्रपटाने ३५ दिवसांत एकूण ८४०.८५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या ते चौथ्या आठवड्यात चित्रपटाने ७८४.५० कोटी, पाचव्या आठवड्यात ५६.३५ कोटी, तर ३५ व्या दिवशी एकट्या ४.७० कोटी रुपयांची कमाई केली.


या ३५ दिवसांत ‘धुरंधर’ने तब्बल ११ मोठे बॉक्स ऑफिस विक्रम मोडले आहेत. हा चित्रपट भारतातील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला असून, त्याने शाहरुख खानच्या ‘जवान’ला मागे टाकले आहे. यासोबतच ‘धुरंधर’ भारतातील चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आणि जगभरात पाचवा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. ‘धुरंधर’ हा रणवीर सिंहच्या कारकिर्दीतील तसेच दिग्दर्शक आदित्य धर यांच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. याशिवाय, हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा ए-रेटेड चित्रपट, २६ दिवसांत ७०० कोटी पार करणारा आणि हिंदी सिनेसृष्टीत दुसऱ्या वीकेंडला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.


 

 

 

 

 

 

Comments
Add Comment

Madhuri Dixit : लवकरच...! सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' चे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री माधुरी दीक्षित

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर

Sara Tendulkar : मला माझ्या होणाऱ्या नवऱ्यामध्ये हवाय असा गुण... सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरचा मोठा खुलासा!

भारतीय क्रिकेटचा देव मानले जाणारे सचिन तेंडुलकर यांची लाडकी लेक सारा तेंडुलकर ही नेहमीच चाहत्यांच्या आणि सोशल

Govinda On Salman Khan: 'पाटर्नर, तू हिरोसारखा दिसत नाहीस...' गोविंदाचं 'ते' वक्तव्य अन् सलमान खानचं नशीब बदललं

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आपल्या खासगी आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने

Dil Chahta Hai completes 25 years : तरुणाईला वेड लावणारा तो एव्हरग्रीन सिनेमा आणि आजही कायम असलेली 'त्या' गाण्याची क्रेझ!

बॉलीवूडमध्ये काही चित्रपट असे असतात, जे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता प्रेक्षकांच्या आयुष्याचा आणि

AR Rahman Son Accident : प्रसिध्द संगीतकार ए.आर. रहमान यांच्या मुलाचा कार अपघात; थोडक्यात बचावला आमीन

चेन्नई : प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान (A R Rahman) यांचा मुलगा आणि गायक ए.आर. आमीन (A R Ameen) याचा कार अपघात झाल्याची धक्कादायक

Dashmi Movie Poster Launch : अन्यायाविरुद्ध उठणार ‘दशमी’ची गर्जना! रहस्य, संघर्ष आणि स्त्रीशक्तीची कहाणी घेऊन मराठी चित्रपटाची दमदार एंट्री

मुंबई : भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजे केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट