Dashavatar Oscars 2026:‘दशावतार’ची ऑस्कर २०२६ मध्ये एन्ट्री,मराठी सिनेविश्वासाठी अभिमानाची बातमी!

Dashavatar Oscars 2026:‘ मराठी सिनेमा सृष्टीसाठी आजचा दिवस हा गौरवाचा ठरला आहे..मराठी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या मुख्य भूमिकेतील आणि सुबोध खानोलकर दिग्दर्शित केलेला ‘दशावतार’ हा चित्रपट आगामी ९८ व्या ऑस्कर पुरस्कारांच्या (Oscars २०२६) ‘कंटेंशन लिस्ट’ मध्ये स्थान मिळवण्यास यश प्राप्त झालं आहे. अशा प्रकारे ऑस्करच्या मुख्य स्पर्धेत स्थान मिळवणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे. हा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरला आहे...

साधारणपणे भारत सरकार एका चित्रपटाची अधिकृत एन्ट्री ऑस्करसाठी करतो, आणि यंदा नीरज घेवान यांचा ‘होमबाउंड’ हा चित्रपट भारताची अधिकृत निवड आहे. मात्र, ‘दशावतार’चे निर्माते यांनी हा चित्रपट स्वतंत्रपणे ऑस्करच्या मुख्य ‘ओपन जनरल’ कॅटेगरीसाठी पाठवला होता. जगभरातील हजारो चित्रपटांमधून निवडल्या गेलेल्या १५०–२५० चित्रपटांच्या यादीत ‘दशावतार’ने आपले स्थान निश्चित केले आहे. या यादीत ‘होमबाउंड’, ‘सीस्टर मीडनाइट’, ‘तन्वी द ग्रेट’, ‘टुरिस्ट फॅमिली’ आणि ‘कांतारा चाप्टर १’ यांसारखे चित्रपटही आहेत. ‘दशावतार’ चित्रपट कोकणातील पारंपरिक ‘दशावतार’ कला, स्थानिक संस्कृती आणि अवैध उत्खननामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांवर भाष्य करतो. ८१ व्या वर्षी दिलीप प्रभावळकर यांनी ‘बाबुली मेस्त्री’ ही मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. त्यांच्या सोबत महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांसारख्या लोकप्रिय कलाकारांची फौज आहे.

२ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही तगडी कमाई केली आणि २८ कोटींहून अधिक कमाई करत २०२५ मधील सर्वात यशस्वी मराठी चित्रपटांपैकी एक ठरला. दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी या यशाबद्दल सांगितले, “हा क्षण ‘दशावतार’चा नाही, तर संपूर्ण मराठी भाषेचा सन्मान आहे.” झी स्टुडिओज आणि ओशन फिल्म कंपनीने यशाचे वर्णन “लाल मातीतील कथेची जागतिक भरारी” असे केले आहे.
Comments
Add Comment

Sunny Deol : सनी देओलच्या ‘बटवारा १९४७’ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; विकेंडला केली जोरदार कमाई, २३ चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले!

सनी देओल (Sunny Deol) आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) यांचा ‘बंटवारा १९४७’ (Batwara 1947) हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी

Babita Singh Reporting Release Date : ‘पाताळ लोक’च्या निर्मात्यांची नवी पेशकश; एक हत्या, दोन रहस्यं आणि स्वतःचा शोध घेणारा एक प्रवास

- प्राइम व्हिडिओने रोमांचक इन्व्हेस्टिगेटिव्ह ड्रामा ‘बबिता सिंग रिपोर्टिंग’च्या वर्ल्डवाइड प्रीमियरची

Actress Ananya Raj : अभिनेत्री अनन्या राजचं वयाच्या २८व्या वर्षी निधन; झोपेत घेतला अखेरचा श्वास

मुंबई : मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेत्री अनन्या राजचं वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी निधन झालं

Upcoming Web Series : सचिन तेंडुलकरच्या जिवलग मित्राची कहाणी लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार; प्रमुख भूमिकेत कोण ?

मुंबई : क्रिकेट विश्वात काही खेळाडूंच्या वैयक्तिक जीवनाची चर्चा त्यांच्या खेळातील विक्रमांपेक्षाही अधिक झाली.

Ashwin Mushran : अभिनेता अश्विन मुश्रानच्या कारचा अपघात, स्थानिकांशी वाद घालतानाचा Viral Video

मडगाव : 'लगे रहो मुन्ना भाई', 'शहजादा', 'फॅशन', 'मैं तेरा हीरो' आणि 'देसी बॉईज' अशा निवडक हिंदी चित्रपटांतून चमकलेला

Govinda and Sunita Ahuja Controversy : सुनीता आहुजाच्या आरोपांवर गोविंदा संतापला; म्हणाला, लिमिटमध्ये राहा...!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वैयक्तिक वाद आता जगजाहीर होऊ लागले आहेत.