‘ठाण्यासह एमएमआर क्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध’

मुख्यमंत्री फडणवीस यांचे ठाणेकरांना आश्वासन


ठाणे : ''ठाणे आणि संपूर्ण एमएमआर क्षेत्रात वाहतुक कोडींचा प्रश्न गंभीर आहे. ही समस्या सरकारला ठाऊक आहे. यावर उपाय म्हणून ठाण्यात मेट्रो सुरू झाली आहे. त्याचे काम पुढेदेखील सुरू राहिल तसेच परिसरातील वेगवेगळे भागदेखील जोडली जातील'' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित आणि ठाणेकरांना आश्वस्त केले. ते ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे बुधवारी झालेल्या विशेष चर्चासत्रात बोलत होते. ज्येष्ठ संपादक मिलिंद बल्लाळ आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत घेतली.


मुख्यमंत्र्यांनी ठाणे व एमएमआर क्षेत्रातील वाहतूक, कचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा आणि शहर विकास यासंदर्भात पुढील योजना स्पष्ट केल्या. ते म्हणाले, ''वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी पहिल्या पाच वर्षांत मेट्रो संकल्पपूर्ती, २०३० पर्यंत सर्व मेट्रो ठाण्याशी जोडण्याचा मनोदय बोलून दाखवला. कोस्टल रोडद्वारे वाहतूक शहराबाहेर नेऊन कोंडी कमी करण्याचा प्रयत्न तसेच शेवटच्या व्यक्तीपर्यंत कनेक्टिव्हिटी सुनिश्चित केल्याचे सांगितले.


पुढील ३–४ वर्षात सर्व डंपिंग बंद करून बायो मायनिंग प्रकल्प सुरू करण्यात येतील. कोलशेत-दिवा मार्गावर पाच जेटी उभारून वॉटर टॅक्सी सुरू करणार असल्याचे सांगुन घोडबंदर रोडसह ग्रोथ हब बनवणे, ठाण्यात इन्क्युबेशन सेंटरबाबतचे नियोजनही फडणवीस यांनी सविस्तरपणे मांडले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, प्रदेश सचिव माधवी देसाई, जिल्हा अध्यक्ष संदीप लेले आदी उपस्थित होते.


तीन वर्षांत पाणी समस्या सोडवणार


पोशीर आणि पेल्हार धरणाचे काम पुढील ३ वर्षांत पूर्ण करणार आहोत. गारगाई प्रकल्पासाठी वन विभागाची परवानगी मिळाली आहे. लवकरच ५०० एमएलडी पाण्याची व्यवस्था होईल. काळू धरण पूर्ण होईपर्यंत मुंबई-ठाण्यात पाणी समस्या सुटणार असल्याचा दावाही त्यांनी केला.


त्यांचा बॅण्ड वाजवल्याणार :


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत. बाळासाहेबांची शिवसेना त्यांच्या नेतृत्वाखाली चालत आहे आणि ठाणे हे त्यांच्या राजकीय ओळखीचे केंद्र आहे. या शहरात त्यांना दुखावणे योग्य नव्हते. यामुळेच कार्यकर्त्यांचा आग्रह असला तरी आम्ही कमी जागा घेऊन शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय घेतला. असे स्पष्ट करून मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, महाराष्ट्रात हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हा एकच ब्रॅण्ड होता. आता कुणीही ब्रॅण्ड म्हणुन उभे राहिले तरी त्यांचा बॅण्ड वाजवल्या शिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

Comments
Add Comment

शिवसेनेत गेलेल्या माजी नगरसेविकेची २४ तासांत भाजपमध्ये घरवापसी

मीरा-भाईंदर : उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या मीरा रोड येथील भाजपच्या माजी नगरसेविका अनिता मुखर्जी यांनी

राज्यातील सर्व महापालिकांवर महायुतीचाच महापौर!

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा विश्वास ठाणे : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारी

कल्याणमध्ये उबाठाला मोठा झटका

अधिकृत उमेदवाराचा शिवसेनेत प्रवेश कल्याण : महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून, प्रचार अंतिम

खारघर-कामोठ्यात कमी दाबाने पाणीपुरवठा

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीत गळती आढळून

राबोडीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमने-सामने

जितेंद्र आव्हाडांच्या प्रचारावेळी अजित पवार गटाचे शक्तिप्रदर्शन ठाणे : ठाण्यातील राबोडी परिसरात बुधवारी

कुणाच्याही भूलथापांना, दबावाला बळी पडू नका

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन नवी मुंबई : कुणाच्याही भुलथापा वा दबावाला बळी पडण्याचे कोणतेही कारण नाही.