मोहित सोमण: ट्रायडंट समुहाने त्यांचीच असूचीबद्ध उपकंपनी (Subsidiary) असलेल्या मायट्रायंडटकंपनी.डॉटकॉम (Mytirdent.com) कंपनीचे अधिग्रहण जाहीर केल्यानंतर कंपनीचा शेअरमध्ये तुफान वाढ झाली आहे. १ लाख रूपयांचे शेअर कंपनीने १० रुपये दर्शनी मूल्य (Face Value) प्रमाणे हे अधिग्रहण केल्याचे एक्सचेंज फायलिंगमध्ये स्पष्ट केले आहे. संपूर्ण रोखीत हा व्यवहार झाल्याचेही कंपनीने स्पष्ट केल्याने संपूर्ण १००% अधिग्रहण कंपनीने केल्याचे म्हटले. त्यामुळे आता ही कंपनी ट्रायडंट समुहाच्या संपूर्ण मालकीची झाली आहे. एकूण १०००० शेअर कंपनीने खरेदी केल्याचे म्हणत ब्रँडची उपस्थिती वाढवण्यासाठी, ब्रँड बिल्डिंग उपक्रमांसाठी 'आणि परदेशी बाजारपेठांमध्ये, विशेषतः अमेरिकेच्या बाजारपेठेत, ट्रायडेंट उत्पादनांची विक्री व विपणन करण्यासाठी, कंपनीची एक देशांतर्गत पूर्ण मालकीची उपकंपनी (DWOS) स्थापन करण्याच्या उद्देशाने Mytrident.com लिमिटेडचे अधिग्रहण करणे आहे.या देशांतर्गत पूर्ण मालकीच्या उपकंपनीचे (DWOS) अधिग्रहण ही बदलत्या व्यापार वातावरणाला प्रतिसाद देण्यासाठी, जोखीम कमी करण्यासाठी आणि जागतिक बाजारपेठेतील नवीन संधींचा फायदा घेण्यासाठी उचललेले एक सक्रिय पाऊल आहे.' असे कंपनीने यावेळी स्पष्ट केले. याशिवाय कंपनीच्या आपल्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात आर्थिक सुधारणा केल्याने कंपनीच्या कापड उद्योगात ७.८८% म्हणजेच जवळपास ८% वाढ झाल्याचे दिसून आले.
तांत्रिकदृष्ट्या शेअर 'बुलिश' असताना अस्थिरतेत शेअर्समध्ये मागणी वाढल्याने कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आज ८% इंट्राडे उच्चांकावर शेअर पोहोचला आहे. दुपारी १२.५९ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ४.६६ रूपये प्रति शेअरवर वाढ झाली होती. कंपनीने आज शेअर्समध्ये २८.५० रूपये इंट्राडे उच्चांकावर वाढ नोंदवली आहे. तिमाही निकालात कंपनीच्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ४.३३% वाढ झाली कंपनीच्या निव्वळ उत्पन्नात (Net Income) ९.३% वाढ झाली आहे. काल कंपनीच्या शेअर्समध्यही उच्चांक वाढ झाली होती. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात कंपनीनं ट्रायडंट ग्लोबल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीत २५० कोटीची गुंतवणूक करून ३०.४२% भागभांडवल (Stake) खरेदी केला होता त्यानंतर शेअर ३० रूपये प्रति शेअर या उच्चांकावर पोहोचला होता.
MyTrident.com लिमिटेड २०२१ मध्ये स्थापन झाली होती.ही एक भारतीय असूचीबद्ध कंपनी असून जिची स्थापना प्रामुख्याने सर्व प्रकारच्या वस्तूंच्या भारतातील आणि भारताबाहेरील ऑनलाइन व्यापारासह, कोणत्याही प्रकारे व्यापार, आयात, निर्यात, विपणन (Marketing) इत्यादी व्यवसाय करण्यासाठी करण्यात आली आहे. याशिवाय मुख्य ट्रायडंट कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या ५ दिवसात २.७३% वाढ झाली असून गेल्या १ महिन्यात १.४०% वाढ झाली आहे तर संपूर्ण वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये १५.४९% घसरण झाली असून इयर टू डेट बेसिसवर (YTD) २.६५% वाढ झाली आहे. तांत्रिकदृष्ट्या व्यापक बाजाराच्या (Broader Market) संदर्भात, सेन्सेक्स कमी पातळीवर उघडला असला तरी आज शेअर त्याच्या ५०-दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेजच्या खाली व्यवहार करत होता पण ५०-डीएमए (Daily Moving Average DMA) २००-डीएमएच्या वर राहिला जे संमिश्रित तांत्रिक कल आहे. या परिस्थितीत ट्रायडेंट लिमिटेडची उत्कृष्ट कामगिरी एकूण बाजाराच्या तुलनेत त्याचे वेगळे वैशिष्ट्य अधोरेखित करते.