कोट्याधीश उमेदवार! लाखोंची गाडी, लाखोंची मालमत्ता.. जाणून घ्या 'या' उमेदवारांच्या संपत्ती विषयी

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. नवनवे उमेदवार आपले नशीब आजमावू पाहत आहेत. तसेच काही उमेदवार हे लखपती असल्याचे ही आता समोर आले आहे. मुंबई महापालिकेसाठी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या मालमत्तेमध्ये दोन निवडणुकांदरम्यान मोठी वाढही झालेली दिसलीच. तसेच पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवारही कोट्याधीश असलयाचे एका प्रतिज्ञा पत्रावरून जाहीर झाले आहे.


उत्तर मुंबई प्रभाग १ मधून काँग्रेसच्या शीतल म्हात्रे रिंगणात असून त्या आर्किटेक्ट आहेत , २०१७ च्या नोंदीनुसार १७ लाख २९ हजारांची एकूण मालमत्ता त्यांच्याकडे होती, आता त्यांची मालमत्ता ४ कोटी २७ लाख असून २३ लाखांहून अधिक किमतीचे सोने, दागिने त्यांच्याकडे आहेत.


तेजस्वी घोसाळकर यांच्या विषयी सांगायचे झाल्यास प्रभाग क्रमांक २ मधून भाजपकडून निवडणूक लढवत आहेत, या आधी शिवसेनेकडून प्रभाग क्रमांक १ मधून निवडून आल्या होत्या. नुकताच त्यांनी भाजपात प्रवेश केला. तेजस्वी यांनी कंप्युटर अप्लिकेशनमध्ये पदवी प्राप्त केली असून . सन २०१७ मध्ये त्यांच्याकडील मालमत्तेची किंमत २५ लाख ८२ हजार रुपये होती, तर आता त्यांच्याकडे ५ कोटी १५ लाखांची मालमत्ता असून, ८५ लाख ५२ हजार रुपये किमतीचे सोने आहे. त्यांनी अलीकडेच ४० लाखांची गाडी खरेदी केल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद आहे.


प्रभाग ७ मधून शिवासी (उबाठा ) पक्षाकडून सौरभ घोसाळकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ते सिविल इंजिनिअर असून, १० कोटींची संपत्ती त्यांच्याकडे आहे


शिवानंद शेट्टी प्रभाग ९ मधून भाजपच्या तिकिटावर लढत असून त्यांचे शिक्षण नववीपर्यंत आहे, २०१२ च्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची संपत्ती ५९ लाख इतकी असून आता एकूण ९ कोटींच्या संपत्तीचे ते मालक आहेत.


प्रभाग १२ मधून प्रीती चोगले दांडेकर अपक्ष म्हणून रिंगणात उभ्या आहेत. त्या कला शाखेत पदवीधर असून २०१७ मध्ये १ कोटी तर आता ११ कोटींची संपत्ती त्यांच्याकडे आहे.


प्रभाग १८ मधून संध्या दोशी शिवसेनेकडून रिंगणात आहेत. त्या वाणिज्य शाखेच्या पदवीधर आहेत. २००२ मध्ये ६ लाख १९ हजार, २००७ मध्ये १६ लाख ७५ हजार, २०१२ मध्ये १ कोटी ७१ लाख, २०१७ मध्ये ३ कोटी २ लाख आणि आता १९ कोटी २६ लाखांची मालमत्ता त्यांच्या नावावर आहे.


मालाड पश्चिम येथील प्रभाग ३३ येथून कमरजहाँ सिद्दीकी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत असून.पदवीधर असलेल्या सिद्दीकी २०१७ मध्ये लाख १ कोटींची मालमत्ता असून आता ४ कोटींची संपत्ती आहे.


प्रभाग ३४ येथून हैदर अस्लम शेख काँग्रेसकडून निवडणूक लढवत असून त्यांच्याकडे व्यवस्थापन अभ्यासक्रमाची पदवी आहे. पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या शेख यांच्याजवळ ११ कोटी ५५ लाखांची मालमत्ता आहे.

Comments
Add Comment

मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक सीओआरएस स्टेशन उभारणार

भारतीय सर्वेक्षण विभागासोबत सामंजस्य करार मुंबई : देशातील भू-स्थानिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण

वांद्र्यांतील रस्ते विकास महामंडळाच्या मुख्यालयावर फेब्रुवारीत हातोडा

पुनर्विकासातून ८ हजार कोटींचा महसूल अपेक्षित मुंबई : वांद्रे रेक्लेमेशन येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास

उमेदवारांना अनावश्यक 'एनओसी'ची सक्ती का?

जनहित याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी मुंबई : गरज नसतानाही निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबईतील काही ठिकाणी मतदान केंद्रांत बदल

राजकीय पक्षांसह उमेदवारांना माहिती देण्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांचे निर्देश मुंबई : मुंबई

महापालिकेच्या शाळांमध्ये गळती कुठे, उबाठाला दिसते कुठे?

वाह रे वाह... पटसंख्या वाढवण्यासाठी दहावीनंतर बारावीपर्यंतचे कॉलेज सुरू करणार म्हणे उबाठा- मनसेचा वचननामा, आमचा

बंडखोरी, नाराजीचा प्रस्थापितांना फटका

हवा दक्षिण मुंबईची महेश पांचाळ :  आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीचा परिसर हा दक्षिण मध्य मुंबई लोकसभा