फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा! महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे हा एकच ब्रँड, ब्रँड सांगणाऱ्यांचाच बँड वाजवू

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. याच दरम्यान ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत प्रसारित झाली. या मुलाखतीआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर अप्रत्यक्ष पण थेट शब्दांत निशाणा साधला आहे.


देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रात एकच ब्रँड होता आणि तो म्हणजे हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. त्यानंतर महाराष्ट्रात कोणीही ब्रँड नाही.” तसेच, स्वतःला ब्रँड म्हणवणाऱ्यांचा आम्ही निवडणुकीत “बँड वाजवू”, असा इशाराही त्यांनी दिला. महायुतीमध्ये कोणीही स्वतःला ब्रँड समजून जनतेसमोर येत असेल, तर त्याचा राजकीय बँड वाजवल्याशिवाय थांबणार नाही, असे फडणवीसांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.


दरम्यान, भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले. “अजित पवार हे महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे आका आहेत,” असा आरोप करत,
“भ्रष्टाचार लपवण्यासाठीच ते भाजपसोबत आले का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावर प्रत्युत्तर देताना अजित पवार म्हणाले, “१५ तारखेनंतर जनता ठरवेल कोण काय आहे.”


आगामी काळात शिवतीर्थावर ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ऐतिहासिक सभा होणार असल्याचं चित्र आहे. तसेच, “उल्हासनगरमध्ये गुंडाराज चालणार नाही,” असा ठाम इशाराही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला

Comments
Add Comment

अजित दादांच्या विमान अपघात वैमानिकांबाबत समोर आले हे धक्कदायक खुलासे .... सस्पेंड, अल्कोहोल टेस्ट......

पुणे : महाराष्ट्राचे लाडके अजित दादा आज अनंतात विलीन झाले. बुधवारी २८ जानेवारी रोजी अजित दादांचा बारामती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रालयात अधिकाऱ्यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या

Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान अपघातानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचे केंद्र सरकारला पत्र; हवाई वाहतूक मंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

कालबद्धरितीने चौकशी पूर्ण करणार मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर मुख्यमंत्री

Shashi Tharoor : 'आमच्यात सर्वकाही अलबेल',राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना भेटल्यानंतर शशी थरूर यांचं विधान

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी आज, गुरुवारी (२९ जानेवारी) पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि विरोधी

एसटी चालकांच्या मद्यपानाविरुद्ध कडक पावले; मुख्यालयाकडून कठोर निर्देश

मुंबई :  २५ जानेवारी रोजी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी अचानकपणे परळ

Supreme Court On UGC: सर्वोच्च न्यायालयाकडून यूजीसीच्या नवीन नियमांना स्थगिती

सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्रीय विद्यापीठ आयोगाच्या  म्हणजेच यूजीसीच्या नवीन नियमांना स्थगिती देण्यात आली