मोहित सोमण: काही ब्रोकरेज कंपन्यांनी सरकारी मालकीची भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड (BHEL) कंपनीच्या शेअर्समध्ये मार्चपर्यंत टेक्निकली बुलिश ट्रेंड अधोरेखित केला होता. तरीही भेल कंपनीच्या शेअर्समध्ये आज दिवसभरात १०% इंट्राडे उच्चांकावर घसरला आहे. दुपारी २.५२ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ९.२१% घसरण झाल्याने प्रति शेअर दर २७५.६० रूपये सुरू आहे. खर तर कंपनीने आज नव्या पुरवठ्याबाबत एक्सचेंज फायलिंगमध्ये स्पष्ट केले आहे. भेलने वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रकल्पासाठी सेमी-हाय-स्पीड अंडरस्लंग ट्रॅक्शन कन्व्हर्टर्सचा पुरवठा सुरू केला असल्याचे कंपनीने आज स्पष्ट केले.
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) ने रेल्वे वाहतूक क्षेत्रासाठीच्या आपल्या 'मेक इन इंडिया' उपक्रमांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा गाठला असल्याचे कंपनीने आज म्हटले. आपल्या निवेदनात,' भेलच्या नेतृत्वाखालील टीआरएसएल (TRSL) सोबतच्या कन्सोर्टियमद्वारे राबवल्या जात असलेल्या प्रतिष्ठित वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रकल्पासाठी अंडरस्लंग ट्रॅक्शन कन्व्हर्टर्सचा पुरवठा सुरू केला आहे.' असे म्हटले. या निमित्ताने, आज भेलच्या बंगळूर येथील प्लांटमध्ये ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात आला होता. भेलच्या संचालक (आयएस अँड पी), सुश्री बानी वर्मा यांनी इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत,वंदे भारत स्लीपर ट्रेनसाठी खास डिझाइन केलेल्या सेमी-हाय-स्पीड अंडरस्लंग ट्रॅक्शन कन्व्हर्टर्सच्या पहिल्या संचाला हिरवा झेंडा दाखवला आहे असे कंपनीने आपल्या अधिकृत निवेदनात स्पष्ट केले आहे. भेलचे संचालक (आर अँड डी), एस एम रामनाथन आणि टीआरएसएलचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक उमेश चौधरी या समारंभात दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, यामुळे भेलने सेमी-हाय-स्पीड प्रोपल्शन सेगमेंटमध्ये धोरणात्मक प्रवेश केला आहे. हे ट्रॅक्शन कन्व्हर्टर्स वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या अंतिम असेंब्लीसाठी कोलकाता येथे पाठवले जात आहेत. याव्यतिरिक्त, या गाड्यांसाठी ट्रॅक्शन मोटर्स आणि ट्रान्सफॉर्मर्ससारखी इतर प्रमुख प्रोपल्शन उपकरणे भेलच्या भोपाळ आणि झांसी युनिट्सद्वारे विकसित आणि उत्पादित केली गेली आहेत.
अत्याधुनिक आयजीबीटी आधारित ट्रॅक्शन कन्व्हर्टर्सने सुसज्ज असलेल्या या अंडरस्लंग डिझाइनमुळे प्रोपल्शन उपकरणे ट्रेनच्या डब्याखाली बसवली जातात, ज्यामुळे प्रवाशांच्या सुविधांसाठी डब्यात बरीच जागा मोकळी होते आणि ट्रेनची एकूण पेलोड क्षमता वाढते असेही कंपनीने म्हटले.या प्रोपल्शन प्रणालीच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये १७६ किमी प्रतितास डिझाइन गतीसह १६० किमी प्रतितास पर्यंतची गती आणि लांब पल्ल्याच्या रात्रीच्या प्रवासादरम्यान विश्वसनीयता सुनिश्चित करण्यासाठी प्रगत थर्मल व्यवस्थापनाचा वापर करून उच्च दर्जाची कार्यक्षम ऊर्जा रूपांतरण यांचा समावेश आहे असेही कंपनीने म्हटले.
ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील देशातील अग्रगण्य उत्पादन पीएसयु कंपनी भेल ऊर्जा,वाहतूक, संरक्षण आणि उद्योग क्षेत्रांमध्ये सर्वोत्तम स्वदेशी उपाय ग्राहकांना प्रदान करते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, लोकोमोटिव्ह आणि डिस्ट्रिब्युटेड पॉवर ट्रेन्ससाठी जटिल तंत्रज्ञानाचे यशस्वीपणे स्वदेशीकरण करून, भेल वाहतूक आणि रोलिंग स्टॉक क्षेत्रात भारताच्या आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने प्रवास करत आहे. ही मोठी अपडेट असतानाही कंपनीच्या शेअर्समध्ये आज मोठी घसरण झाली. शेअर बाजारातील अस्थिरतेचा व मागणीपेक्षा पुरवठा अधिक राहिल्याचा फटका शेअरला बसला होता.
सप्टेंबर २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीत, कंपनीचा निव्वळ नफा इयर ऑन इयर बेसिसवर ३०२.७% वाढून ३६०५ दशलक्ष रुपये झाला, जो मागील वर्षी याच तिमाहीत ८९५ दशलक्ष रुपये होता. या कालावधीत निव्वळ विक्री १४.१% वाढून ७५११८ दशलक्ष रुपये झाली, तर जुलै-सप्टेंबर २०२४ मध्ये ती ६५८४१ दशलक्ष रुपये होती.मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी, BHEL ने निव्वळ नफ्यात ८९.२% वाढ नोंदवली असून तो ५,३३९ दशलक्ष रुपये झाला आहे, तर आर्थिक वर्ष २४ मध्ये निव्वळ नफा २,८२२ दशलक्ष रुपये होता. वास्तविकता शेअर गेल्या ४ महिन्यात ४४% घसरले आहेत. काल कंपनीच्या शेअर्समध्ये ३% वाढ बीएसईत (Bombay Stock Exchange NSE) वाढ झाल्याने शेअर १७ आठवड्यातील सर्वाधिक पातळीवर म्हणजेच ३०५.८५ रूपये प्रति शेअरवर पोहोचले होते. तत्पूर्वी नोव्हेंबर २००७ मध्ये शेअर ३९० रुपये प्रति शेअर या नव्या उच्चांकावर पोहोचले होते. गेल्या ५ दिवसात कंपनीच्या शेअर्समध्ये ६.५२% घसरण व एक महिन्यात १.३०% वाढ झाली आहे. गेल्या १ वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये २३.४१% वाढ झाली असून इयर टू डेट बेसिसवर (YTD) ६.२८% घसरण झाली आहे.