बिहार :प्रेमामध्ये माणुस काहीही करू शकतो. असच एका युवकाने ट्रान्सजेंडरसोबत लग्न केलं पण तिच गोष्ट त्याच्या अंगलट आली. बिहार मधील लखीसराय जिल्ह्यातील किउल पोलीस स्टेशन हद्दीत एक धक्कादायक हत्याकांड उघडकीस आले आहे. आरोपी मयताची पत्नी गुंजा, जिने ट्रान्सजेंडर असल्याचे सांगितले जाते, आपल्या प्रेमी संतोष कुमारसोबत कट रचून पती विनोद साहची हत्या करण्यास उत्तरदायी आहे. गुंजाने आपल्या प्रेमीस एक लाख रुपयांची सुपारी दिली आणि पतीला मार्गातून हटवण्याचा कट रचला.
घटना २४ डिसेंबर २०२५च्या संध्याकाळची असून, विनोद साहला पत्नीने आमिष दाखवून किउल नदीकाठी नेले. तिथे संतोष कुमार आणि त्याचे तीन साथीदार राज नारायण, मोहम्मद आफताब आणि अजीत कुमार घात टाकून बसले होते. विनोद साह घटनास्थळी पोहोचताच आरोपींनी ब्लेडने त्याचा गळा रेतून गंभीर जखमी केले. त्याला कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची माहिती पोलीसांना दिली, ही सर्व माहिती पोलीसांकडुन समोर आली आहे.आणि रात्री उशिरा नदीकाठी जखमी अवस्थेत सापडले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर गुंजा ट्रान्सजेंडरने पोलिसांना गुमराह करण्यासाठी खोट्या तक्रारी केल्या, मात्र SIT च्या सखोल चौकशीत तिची सर्व भूमिका उघडकीस आली. पोलिसांनी गुंजा, संतोष कुमार आणि तिघा साथीदारांना अटक केली आहे. हत्येत वापरलेले ब्लेड आणि रक्ताने माखलेले कपडे जप्त करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक अजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली SIT ने हा प्रकरण तपासून आरोपींना न्यायिक कोठडीत पाठवले आहे. ही घटना प्रेम, विश्वासघात आणि हत्येचा धक्कादायक संगम म्हणून परिसरात शोककळा पसरवणारी ठरली आहे.